Join us

Onion Bajarbhav : आज रविवारच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 6:36 PM

Kanda bajarbhav : राज्यातील बाजार समित्यामध्ये आज कांद्याला (Onion Market) सरासरी इतका दर मिळाला. पाहुयात सविस्तर

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion Market) 38 हजार 514 क्विंटलची आवक झाली. रविवार असल्याने काही निवडक बाजार समितीमध्येच कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले. तर आज कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 09 जून 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याची (Red Onion Market) केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये 66 क्विंटलची आवक झाली तर पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 15000 क्विंटलची आवक झाली. त्यानंतर सर्वसाधारण आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला मंचर बाजारात 2825 रुपये, दौंड केडगाव बाजार समितीत 2800 रुपये, सातारा बाजार समितीत 2800 रुपये आणि राहता बाजार समितीत 2500 रुपयांचा दर मिळाला.

तर आज लाल कांद्याला धाराशिव बाजार समिती पंचवीसशे रुपये तर भुसावळ बाजार समितीत 800 रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला 2100 रुपये दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला पारनेर बाजार समितीत 2400 रुपये तर रामटेक बाजार समितीत 1900 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे कांदा बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/06/2024
अहमदनगर---क्विंटल621570038002500
अहमदनगरउन्हाळीक्विंटल7426100035002400
धाराशिवलालक्विंटल25200030002500
जळगावलालक्विंटल41160020001800
नागपूरउन्हाळीक्विंटल40180020001900
पुणे---क्विंटल4529160036052813
पुणेलोकलक्विंटल15328146727332100
पुणेचिंचवडक्विंटल4715110035502510
सातारा---क्विंटल195250032002800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)38514
टॅग्स :कांदाशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड