Join us

Onion Market : कुठल्या कांद्याला सर्वाधिक भाव, लाल की उन्हाळ? जाणून घ्या सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 6:17 PM

आजच्या बाजार अहवालानुसार बाजार समितीमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळाला हे पाहुयात..

कांद्याचा प्रश्नावरून अद्यापही सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून बाजारभावात सुधारणा नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आता कुठे कांदा बाजारभाव काहीसा समाधानकारक असा मिळू लागला आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1860 रुपये बाजारभाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1810 रुपये बाजारभाव मिळाला.

आज 09 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक 40 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज लाल, उन्हाळ, लोकल कांद्यासोबत हालवा आणि पांढऱ्या कांद्याची देखील आवक झाली. सोलापूर बाजार समिती सोडली इतर बाजार समित्यांमध्ये आज इतर दिवसांच्या तुलनेत आवक कमी झाल्याचे दिसून आले.  मात्र सर्वच बाजार समित्यांचा विचार केला तर जवळपास दीड लाखाहून अधिक आवक झाली. सर्वात कमी आवक कामठी बाजार समितीत केवळ 4 क्विंटलची आवक झाली. 

आजच्या दिवसातील सर्वाधिक 2 हजार रुपयांचा बाजारभाव कराड, कामठी आणि पेन बाजार समितीत मिळाला. यात हालवा, लोकल आणि लाल कांद्याचा समावेश आहे. तर सर्वात कमी 910 रुपयांचा बाजारभाव यावल बाजार समितीत लाल कांद्याला मिळाला. आज नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची 1000 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1800 रुपये बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत पोळ कांद्याची 9506 आवक झाली. या कांद्याला सरासरी 1800 रुपये बाजारभाव मिळाला. 

उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

आज लासलगाव बाजार समितीसह राहूरी -वांबोरी, चांदवड, नेवासा -घोडेगाव, पिंपळगाव बसवंत, अहमदनगर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली. सर्व बाजार समित्यांमध्ये 1200 रुपयांपासून ते 1800 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. सर्वाधिक 1800 रुपयांचा बाजारभाव चांदवड बाजार समितीत मिळाला आहे. तर सर्वात कमी 1200 रुपये बाजारभाव राहूरी -वांबोरी या बाजार समितीत मिळाला. 

असे आहेत कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/03/2024
कोल्हापूर---क्विंटल957260020001400
अकोला---क्विंटल250120018001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल149470020001350
कराडहालवाक्विंटल99150020002000
सोलापूरलालक्विंटल4017730023001400
बारामतीलालक्विंटल93930016511251
येवलालालक्विंटल1000070019381750
येवला -आंदरसूललालक्विंटल200070018621772
धुळेलालक्विंटल117720018001600
जळगावलालक्विंटल172570018501500
नागपूरलालक्विंटल1800150020001875
सिन्नर - नायगावलालक्विंटल11750018801750
चांदवडलालक्विंटल6282113521361850
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल483160018601720
पेनलालक्विंटल330200022002000
भुसावळलालक्विंटल15100015001200
यावललालक्विंटल17557301075910
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल36950021001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल924940020001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13140018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल60570017001200
मंगळवेढालोकलक्विंटल6629014001250
कामठीलोकलक्विंटल4150025002000
नागपूरपांढराक्विंटल1000160020001800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल950640019991800
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल90210019001200
चांदवडउन्हाळीक्विंटल667160019311800
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल818340020001600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल911160019161700
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक