Lokmat Agro >बाजारहाट > ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव 

ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News Todays Sorgham market price in maharashtra bajar samiti | ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव 

ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव 

एकीकडे जसजशी नवीन ज्वारी बाजारात येऊ लागली आहे. तसतशी दरात काहीसा बदल जाणवू लागला आहे.

एकीकडे जसजशी नवीन ज्वारी बाजारात येऊ लागली आहे. तसतशी दरात काहीसा बदल जाणवू लागला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे जसजशी नवीन ज्वारी बाजारात येऊ लागली आहे. तसतशी दरात काहीशी वाढ लागली आहे. कालच्या दरापेक्षा आज लोकल ज्वारीच्या दरात पन्नास रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या बाजार अहवालानुसार अमरावती बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी 2700 रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे हळूहळू दरात वाढ होत असल्याची चिन्हे आहेत. 

आज 04 मार्च 2024 च्या बाजार दर अहवालानुसार बाजार समित्यांमध्ये लोकल, मालदांडी, शाळू, हायब्रीड, दादर, पांढरी, पिवळी, रब्बी अशा ज्वारीची आवक झाली. जालना बाजार समितीत शाळू या ज्वारीची सर्वाधिक 3 हजार 117 क्विंटलची आवक झाली. त्याखालोखाल पाचोरा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. मात्र दोन दिवसांच्या तुलनेत आज ज्वारीची आवक घटल्याचे दिसून आले. आज सर्वाधिक 5 हजार 200 रुपयांचा बाजारभाव पुणे बाजार समितीत मालदांडी या वाणाला मिळाला. मात्र इथे कालच्या तुलनेत दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. तर सर्वात कमी 1705 रुपयांचा बाजारभाव सिन्नर बाजारसमितीत मिळाला. 

एकूणच वाणानुसार बाजारभाव पाहिला असता दादर वाणाला सरासरी 3100 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर हायब्रीड वाणाला सरासरी 2400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. लोकल ज्वारीला 2600 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. मालदांडी वाणाला सरासरी प्रति क्विंटलला 3 हजार रुपये बाजारभाव मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2600 रुपयांचा बाजारभाव मिळाला. रब्बी ज्वारीला सरासरी 2500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी 2660 रुपयांचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे आजच्या दिवसातील सर्वाधिक बाजारभाव हा दादर ज्वारीला मिळाल्याचे दिसून आले. 

असे आहेत ज्वारीचे सविस्तर दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/03/2024
दोंडाईचा---क्विंटल39210026002450
सिन्नर---क्विंटल5110017501705
संगमनेर---क्विंटल9200021602080
करमाळा---क्विंटल619250047003600
कुर्डवाडी---क्विंटल67210030012451
राहता---क्विंटल21192125012211
धुळेदादरक्विंटल9232524022402
जळगावदादरक्विंटल538246033253040
जलगाव - मसावतदादरक्विंटल17270027002700
दोंडाईचादादरक्विंटल112270032993000
अमळनेरदादरक्विंटल600317638503850
पाचोरादादरक्विंटल500247128212600
धुळेहायब्रीडक्विंटल67160524302331
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल140230023002300
सांगलीहायब्रीडक्विंटल130318033003240
चिखलीहायब्रीडक्विंटल45220030002600
नागपूरहायब्रीडक्विंटल3350038003725
अमळनेरहायब्रीडक्विंटल300202524552455
शेवगावहायब्रीडक्विंटल7200020002000
धरणगावहायब्रीडक्विंटल50200626312190
आखाडाबाळापूरहायब्रीडक्विंटल26200023002150
अमरावतीलोकलक्विंटल15250029002700
लासलगावलोकलक्विंटल79168025512355
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल1330033003300
मुंबईलोकलक्विंटल2041260060004500
कोपरगावलोकलक्विंटल1190119011901
सोलापूरमालदांडीक्विंटल12344035203520
पुणेमालदांडीक्विंटल665480056005200
जामखेडमालदांडीक्विंटल690250040003250
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल45184127612012
नांदगावमालदांडीक्विंटल5202526202600
परांडामालदांडीक्विंटल29227530002850
मालेगावपांढरीक्विंटल15159624562000
पाचोरापांढरीक्विंटल2700198524602251
चाकूरपांढरीक्विंटल38230036002750
औराद शहाजानीपांढरीक्विंटल6290032003050
मुरुमपांढरीक्विंटल34430043214310
तुळजापूरपांढरीक्विंटल85250035003000
पाथरीपांढरीक्विंटल67140025352201
दुधणीपांढरीक्विंटल173200033352800
माजलगावरब्बीक्विंटल259150027122451
गेवराईरब्बीक्विंटल30156032002700
जालनाशाळूक्विंटल3117150030112550
सांगलीशाळूक्विंटल250330052004250
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल98190034212660
देउळगाव राजाशाळूक्विंटल25180021002000
कल्याणवसंतक्विंटल3380044004100

Web Title: Latest News Todays Sorgham market price in maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.