Join us

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 7:26 PM

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली.

आज ज्वारीची निवडक बाजार समित्यांमध्ये आवक झाली असून लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. या ज्वारीला सरासरी 2780 रुपये दर मिळाला. काल औराद शहाजानी या बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला सरासरी 3152 रुपये, तुळजापूर बाजारात 3000 रुपये, उमरगा बाजार समितीत 2676 रुपये दर मिळाला. 

आज सिल्लोड बाजार समितीत पिवळ्या मक्याला कमीत कमी 2050 रुपये तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. तर काल छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत पिवळ्या मक्याला सरासरी 1950 रुपये दर मिळाला. धुळे बाजारात पिवळ्या मक्याला सरासरी 2075 रुपये दर मिळाला. तर भोकरदन बाजार समितीत सरासरी 2100 रुपये दर मिळाला. 

तसेच तुरीची देखील काही बाजार समित्यांमध्ये आवक झाली. यानुसार वरोरा-खांबाडा बाजार समितीत लाल तुरीला 9800 रुपये, तर औसा बाजार समितीत 11200 रुपये दर मिळाला. शेवगाव बाजार समितीत पांढऱ्या तुरीला 10700 रुपये दर मिळाला. तुरीचा भाव दहा हजारी पार गेला असून या पिकाच्या माध्यमातून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 

टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डकांदालातूरशेती