Join us

जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 6:48 PM

आज मालदांडी, हायब्रीड आणि दादर ज्वारीची चांगली आवक झाली. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचा नंबर लागला.

ज्वारीची आवक घटली असून आतापर्यंत केवळ पाच हजार क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले. आज मालदांडी, हायब्रीड आणि दादर ज्वारीची चांगली आवक झाली. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचा नंबर लागला. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ज्वारीला सरासरी 2 हजार रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

आज 23 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज दादर ज्वारीला धुळे बाजार समितीत 2655 इतका सरासरी भाव मिळाला. मात्र जळगाव बाजार समितीत सर्वाधिक 5340 रुपये भाव मिळाला. हायब्रीड ज्वारीला 2100 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकट्या अमरावती बाजार समितीत आलेल्या लोकल ज्वारीला 2600 रुपये दर मिळाला. 

तर पाच बाजार समित्या मिळून पांढऱ्या ज्वारीची 350 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी पांढऱ्या ज्वारीला 2100 रुपयापासून ते 3900 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तर रब्बी ज्वारीला दोन बाजार समित्यांमध्ये सरासरी 2 हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. माजलगाव बाजार समितीत जवळपास 2900 रुपयांचा दर मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी 2 हजारपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. मालदांडी ज्वारीला इतर ज्वारीपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. मात्र या ज्वारीला बाजारभावाचा फटका बसत आहे. 

असे आहेत आजचे ज्वारीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/03/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल5170125001850
वैजापूर---क्विंटल20151023552100
राहता---क्विंटल16180223512075
धुळेदादरक्विंटल73180028502655
जळगावदादरक्विंटल41525055505340
पाचोरादादरक्विंटल600227526502451
अकोलाहायब्रीडक्विंटल69175026352250
धुळेहायब्रीडक्विंटल543200721832145
जळगावहायब्रीडक्विंटल553240031002900
सांगलीहायब्रीडक्विंटल330318033003240
चिखलीहायब्रीडक्विंटल18150020001750
नागपूरहायब्रीडक्विंटल3340036003550
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4260026002600
नांदूराहायब्रीडक्विंटल160185021532153
अमरावतीलोकलक्विंटल3245027502600
सोलापूरमालदांडीक्विंटल19325036803410
पुणेमालदांडीक्विंटल677420050004600
जामखेडमालदांडीक्विंटल716250045003500
पाथर्डीमालदांडीक्विंटल12225029002550
वडूजमालदांडीक्विंटल300380040003900
मंगळवेढामालदांडीक्विंटल80260032003000
आंबेजोबाईमालदांडीक्विंटल4325032503250
परांडामालदांडीक्विंटल43315036003200
ताडकळसनं. १क्विंटल40200025002300
मालेगावपांढरीक्विंटल60194138002699
पाचोरापांढरीक्विंटल200200022352131
औराद शहाजानीपांढरीक्विंटल16250035512875
मुरुमपांढरीक्विंटल10220042503225
तुळजापूरपांढरीक्विंटल105250039003550
दुधणीपांढरीक्विंटल58340544703925
माजलगावरब्बीक्विंटल272180031752900
जिंतूररब्बीक्विंटल4200020002000
गेवराईरब्बीक्विंटल8170028902000
सांगलीशाळूक्विंटल323350052004350
चिखलीशाळूक्विंटल12180023002050
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल15190024022151
परतूरशाळूक्विंटल11220023502275
देउळगाव राजाशाळूक्विंटल50220023002250
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदाज्वारीजळगाव