आज गुड फ्रायडे असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतमालाची आवक देखील कमी झाली आहे. आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची केवळ 03 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज बाजार अहवालानुसार ज्वारीला सरासरी 2410 रुपयापासून ते 4350 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
आज 29 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यातील बार्शी, जळगाव, जलगाव - मसावत, शेवगाव - भोदेगाव, पुणे, पैठण समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली. यात सर्वाधिक 2057 क्विंटल सर्वसाधारण ज्वारीची आवक झाली. तर पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीची 672 क्विंटल आवक झाली. हायब्रीड ज्वारीची केवळ 5 क्विंटल आवक झाली.
तर आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 4000 रुपये भाव मिळाला. दादर ज्वारीला जळगाव बाजार समितीत सरासरी 2860 रुपये दर तर जळगाव-म्हसावत बाजार समितीत सरासरी 2410 दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 3000 रुपये दर मिळाला. पुण्यात मालदांडी ज्वारीला सरासरी 4350 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत दाखल झालेल्या रब्बी ज्वारीला सरासरी 3600 रुपये दर मिळाला.
असे आहेत ज्वारीचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
29/03/2024 | ||||||
बार्शी | --- | क्विंटल | 2057 | 3000 | 4600 | 4000 |
जळगाव | दादर | क्विंटल | 161 | 2555 | 2905 | 2860 |
जलगाव - मसावत | दादर | क्विंटल | 97 | 2300 | 2630 | 2410 |
शेवगाव - भोदेगाव | हायब्रीड | क्विंटल | 5 | 3000 | 3000 | 3000 |
पुणे | मालदांडी | क्विंटल | 672 | 3800 | 4900 | 4350 |
पैठण | रब्बी | क्विंटल | 10 | 2700 | 4626 | 3600 |