Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : मुंबईत ज्वारीची सर्वाधिक आवक, तर लोकल ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर दर 

Sorghum Market : मुंबईत ज्वारीची सर्वाधिक आवक, तर लोकल ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर दर 

Latest News Todays Sorghum market price in market yard see details | Sorghum Market : मुंबईत ज्वारीची सर्वाधिक आवक, तर लोकल ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर दर 

Sorghum Market : मुंबईत ज्वारीची सर्वाधिक आवक, तर लोकल ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर दर 

राज्यातील बाजार समित्यामध्ये कुठल्या ज्वारीची सर्वाधिक आवक झाली, किती भाव मिळाला, हे पाहुयात..

राज्यातील बाजार समित्यामध्ये कुठल्या ज्वारीची सर्वाधिक आवक झाली, किती भाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दुपारी साडे तीनवाजेपर्यंत 3 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली. काल दिवसभरात जवळपास 22 हजार क्विंटलपर्यंत ज्वारीची आवक झाली होती. मात्र आज आवक घटल्याचे दिसून आले. आज ज्वारीला सरासरी 2500 रुपये पासून  ते 4500 पर्यंत भाव मिळाला. आज देखील मालदांडी ज्वारीच्या दरात घसरण झाली असून आज सरासरी 4600 रुपये दर मिळाला. 

आज 22 मार्च रोजी पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यातील बाजार समित्यामध्ये 3154 क्विंटल ज्वारीची आवक झाली. यात सर्वाधिक 1035 क्विंटल लोकल ज्वारीची आवक झाली. जळगाव, धुळे, पुणे, मुंबई, तुळजापूर आदी बाजार समित्यांमध्ये चांगली आवक झाली. आज लोकल ज्वारीसह मालदांडी ज्वारीला सर्वाधिक अनुक्रमे 4500, 4600 रुपये दर मिळाला. 

आज जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीला सरासरी 2950 रुपये दर मिळाला. धुळे बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला 2160 रुपये दर मिळाला. मुंबई बाजार समितीमध्ये लोकल ज्वारीला 4500 रुपये दर मिळाला. तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला 3850 भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत शाळु ज्वारीला 2118 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/03/2024
सेलु---क्विंटल15220028602500
धुळेदादरक्विंटल102210028502795
जळगावदादरक्विंटल568252531002950
धुळेहायब्रीडक्विंटल382202021812160
अमरावतीलोकलक्विंटल3250028002650
मुंबईलोकलक्विंटल1035260060004500
सोलापूरमालदांडीक्विंटल37328037653505
पुणेमालदांडीक्विंटल686420050004600
नांदगावमालदांडीक्विंटल17200126802550
मोहोळमालदांडीक्विंटल40290032002900
तुळजापूरपांढरीक्विंटल120250040253850
पाथरीपांढरीक्विंटल13220026862552
दुधणीपांढरीक्विंटल57270036803200
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल17208521502118
परतूरशाळूक्विंटल12200022002100
देउळगाव राजाशाळूक्विंटल25200022252150
तासगावशाळूक्विंटल23336036003500

Web Title: Latest News Todays Sorghum market price in market yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.