आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीची 685 क्विंटल आवक झाली. तर तुळजापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या ज्वारीची 95 क्विंटल आवक झाली. दोन्ही ज्वारी मिळून 780 क्विंटलची आवक झाली. तर मालदांडी ज्वारीला आज 4500 रुपये सरासरी दर मिळाला. या ज्वारीच्या दरात मागील काही दिवसात सातशे रुपयांची घसरण झाली आहे.
आज 25 मार्च रोजी तुळजापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या ज्वारीला सरासरी 3850 रुपये असा दर मिळाला. काल म्हणजे 24 मार्च रोजी विचार केला तर सिल्लोड बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला 2000 सरासरी दर मिळाला. अहमहदनगर बाजार समितीत लोकल ज्वारीला 3500 रुपये दर मिळाला.
शनिवार मिळालेले दर
आज 23 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज दादर ज्वारीला धुळे बाजार समितीत 2655 इतका सरासरी भाव मिळाला. मात्र जळगाव बाजार समितीत सर्वाधिक 5340 रुपये भाव मिळाला. हायब्रीड ज्वारीला 2100 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकट्या अमरावती बाजार समितीत आलेल्या लोकल ज्वारीला 2600 रुपये दर मिळाला.
आज आणि कालचे ज्वारीचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
25/03/2024 | ||||||
पुणे | मालदांडी | क्विंटल | 685 | 4000 | 5000 | 4500 |
तुळजापूर | पांढरी | क्विंटल | 95 | 2700 | 4100 | 3850 |
24/03/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 4 | 2000 | 2000 | 2000 |
कर्जत (अहमहदनगर) | लोकल | क्विंटल | 72 | 2500 | 4200 | 3500 |