Join us

Sorghum Market : श्रीरामनवमीला ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 19:10 IST

आज श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते.

आज श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. त्यामुळे आज ज्वारीची कमी झाली असून अवघ्या 860 क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज मालदांडी, रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2171 रुपयापासून ते 4300 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 17 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या माहितीनुसार पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीची 693 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 3400 रुपये तर सरासरी 4300 रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. पाथर्डी बाजार समितीत देखील मालदांडी ज्वारीची 13 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत  कमीत कमी 2200 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. 

तसेच तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची 150 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 3575 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीची 4 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला कमीत कमी 2171 रुपये तर सरासरी देखील 2171 रुपयेच दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/04/2024
पुणेमालदांडीक्विंटल693340052004300
पाथर्डीमालदांडीक्विंटल13220028002500
तुळजापूरपांढरीक्विंटल150250040003575
पैठणरब्बीक्विंटल4217121712171
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीपुणेराम नवमी