Join us

Soyabean Bajarbhav :अमरावती, अमळनेर, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 6:17 PM

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 11 हजार 888 क्विंटलची आवक झाली.

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 11 हजार 888 क्विंटलची आवक झाली. तर आज सोयाबीनला सरासरी 4100 रुपयापासून ते 4 हजार 600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर केवळ जालना (Jalna Bajar Samiti) बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला (Yellow Soyabean) सर्वात कमी म्हणजेच 2135 रुपयांचा सरासरी दर मिळाला.

आज आठवड्याचा पहिला दिवस असूनही सोयाबीनची आवक घसरल्याचे दिसून आले. आज सर्वसाधारण सोयाबीनची 800 क्विंटल झाली. तर या सोयाबीनला सरासरी 4271 रुपयांपासून ते 4450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज लोकल सोयाबीनची अमरावती बाजार समिती 2583 क्विंटलची आवक झाली. तर या सोयाबीनला सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 510 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

तर आज हिंगणघाट बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक 2081 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत सरासरी 3800 रुपयांचा दर मिळाला. आज दिवसभरात पिवळ्या सोयाबीनला सरासरी 2135 रुपयांपासून ते 04 हजार 600 रुपयापर्यंत दर मिळाला. यात अकोला बाजार समिती 4355 रुपये, यवतमाळ बाजार समिती 4285 रुपये, मालेगाव बाजार समितीत 04 हजार 387 रुपये, बीड बाजार समिती 4525 रुपये, मलकापूर बाजार समिती 4300 तर गेवराई बाजार समिती 4 हजार 320 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे सोयाबीनचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/07/2024
अहमदनगरलोकलक्विंटल133409144244345
अकोलापिवळाक्विंटल871410044954355
अमरावतीलोकलक्विंटल2583435044254387
बीड---क्विंटल138440044684450
बीडपिवळाक्विंटल63434944424429
बुलढाणालोकलक्विंटल390400044154300
बुलढाणापिवळाक्विंटल1140409043524291
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल5440044504420
धाराशिव---क्विंटल45447544754475
धाराशिवपिवळाक्विंटल18419543904350
हिंगोलीलोकलक्विंटल650405044914270
जळगाव---क्विंटल40425043204271
जळगावलोकलक्विंटल8417542254225
जालनापिवळाक्विंटल20203622512135
लातूरपिवळाक्विंटल848424745274476
नागपूरलोकलक्विंटल277410045004400
नागपूरपिवळाक्विंटल320405043554300
नांदेडपिवळाक्विंटल5460046004600
नाशिक---क्विंटल565300044724400
नाशिकपिवळाक्विंटल17410845444394
परभणीपिवळाक्विंटल122433844234363
सोलापूरलोकलक्विंटल25451045104510
वर्धापिवळाक्विंटल2377340045104153
यवतमाळपिवळाक्विंटल1228390744824310
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)11888
टॅग्स :सोयाबीनशेतीमार्केट यार्डजालनाअमरावती