Join us

Soyabean Bajarbhav : तासगाव बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:10 IST

Soyabean Rate : आज दिवसभरात 13 हजार 100 क्विंटलची आवक झाली, तर इतका सरासरी दर मिळत आहे.

Soyabean Bajarbhav : एकीकडे सोयाबीनच्या लागवडीचा (Soyabean Cultivation) विचार सुरू असताना दुसरीकडे बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. आज दिवसभरात 13 हजार 100 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 04 हजार रुपयांपासून ते 04 हजार 800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. तर पिवळ्या सोयाबीनची (Soyabean Market) सर्वाधिक 4 हजार क्विंटलची आवक होताना दिसत आहे.

आज सर्वसाधारण सोयाबीनला सरासरी 4 हजार 200 रुपयांपासून ते चार हजार 450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात बार्शी बाजार समितीत 04 हजार 400 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समिती (Sambhajinagar Market Yard) 4265 रुपये, तर राहता बाजार समितीत 04 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. यानंतर लोकल सोयाबीनला सरासरी 04 हजार रुपयांपासून ते 3 हजार 300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. अमरावती बाजार समिती 4 हजार 300 रुपये, नागपूर बाजार समिती 4 हजार 341 रुपये, हिंगोली बाजार समिती 4 हजार 245 रुपयांचा दर मिळाला.

तर आज पिवळ्या सोयाबीनला अकोला बाजार समिती 4290 रुपये, यवतमाळ बाजार समिती 4250 रुपये, मालेगाव बाजार समिती 4341 रुपये, पैठण बाजार समितीत चार हजार शंभर रुपये, जिंतूर बाजार समिती 4325 रुपये, गेवराई बाजार समिती 4000 रुपये, तर देऊळगाव राजा बाजार समितीत 4255 दर मिळाला आणि सर्वाधिक दर हा तासगाव बाजार समितीत मिळाला. 

असे आहेत सोयाबीन बाजारभाव 

टॅग्स :सोयाबीनशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड