Join us

Soyabin Market: आज सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 3:34 PM

सोयाबीनचे दर वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे, पण दर वाढण्याची शक्यता धुसर असल्याची चिन्हे आहेत.

आज दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी वाशिम बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची 2400 क्विंटल आवक झाली. बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजारभाव 4475 रुपये प्रति क्विंटल मिळाला, तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. हा दर सरकारी हमीभावापेक्षा कमी आहे. 

आज नागपूर बाजारसमितीत लोकल सोयाबीनला सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मुर्तीजापूर बाजारसमितीत पिवळा सोयाबीनला 4565 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. दरम्यान हिंगोली- खानेगाव नाका, उमरखेड-डांकी या ठिकाणी सोयाबीनचे सरासरी बाजारभाव साडे चार हजाराच्या आसपास राहिले. लासलगाव बाजार समितीमध्ये आज कमीत कमी सोयाबीन  4500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर सरासरी 4700 रुपये प्रती क्विंटल इतका भाव मिळाला. 

राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.. 

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/01/2024
नागपूरलोकल884420046004500
वाशीमपिवळा2400447546504550
वाशीम - अनसींगपिवळा600445047004650

हिंगोली-

खानेगाव नाका

पिवळा134445046004525
मुर्तीजापूरपिवळा1200444046854565
सेनगावपिवळा163435046004500
उमरखेड-डांकीपिवळा290460046504620
टॅग्स :मार्केट यार्डकांदा