Join us

Sorghum Market : अजनगाव सुर्जी बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 6:19 PM

आज रविवार असल्याने काही मोजक्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली.

आज रविवार असल्याने काही मोजक्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली. यात राज्यातील उदगीर, अजनगाव सुर्जी आणि औसा बाजार समितीमध्ये सोयाबीनची 4500 क्विंटलची आवक झाली. आज सरासरी 4300 रुपये ते 4607 रुपये दर मिळाला. या पिवळ्या सोयाबीनची अधिक आवक झाल्याचे दिसून आले. 

आज 12 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उदगीर बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनची आवक झाली. यात कमीत कमी 4580 रुपये ते सरासरी 4590 रुपये दर मिळाला. अजनगाव सुर्जी बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 43 क्विंटलची आवक झाली. पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी 4200 रुपये ते 4300 रुपये दर मिळाला. 

तर औसा बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 1594 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 4401 रुपये ते सरासरी 4607 रुपये दर मिळाला. काल लातूर बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला 4600 रुपये दर मिळाला होता. काल उदगीर बाजार समितीत सर्वसाधारण बाजार समितीत सरासरी 4565 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/05/2024
उदगीर---क्विंटल2900458046014590
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल43420044004300
औसापिवळाक्विंटल1594440146324607
टॅग्स :सोयाबीनशेतीमार्केट यार्डशेती क्षेत्र