Join us

Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याला सरासरी काय दर मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 6:42 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 30 हजार 934 क्विंटल आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 30 हजार 934 क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 78 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला 1200 रुपयांपासून 1650 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 18 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत 850 रुपये अकोला बाजार समितीत 1200 रुपये कोल्हापूर बाजार समिती 1400 रुपये तर खेड चाकण बाजार समितीत सर्वाधिक 1800 रुपयांचा दर मिळाला. जुन्नर नारायणगाव बाजार समितीत चिंचवड कांद्याला 1000 रुपये तर कराड बाजार समितीत हलवा कांद्याला 1800 रुपयांचा सरासरी दर मिळाला.

तसेच आज लाल कांद्याला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1050 रुपये धुळे बाजार समितीत 1190 रुपये नागपूर बाजार समिती 1375 रुपये साक्री बाजार समिती 1500 रुपये असा दर मिळाला तर लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1325 रुपये, पुणे पिंपरी बाजार समिती 1350 रुपये असा दर मिळाला. तर शेवगाव बाजार समितीत नंबर एकच्या कांद्याला 1500 रुपयांचा दर मिळाला.

दरम्यान आज उन्हाळ कांद्याला येवला बाजार समितीत 1540 रुपये, नाशिक बाजार समिती 1300 रुपये, लासलगाव बाजार समिती 1500 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती सर्वाधिक 1650 रुपये, राहुरी वांबोरी बाजार समिती 1200 रुपये, चांदवड बाजार समितीत 1540 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1550 रुपये असा दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे सविस्तर दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/05/2024
अहमदनगरनं. १नग1530150022001500
अहमदनगरनं. २नग1230100014001400
अहमदनगरनं. ३नग1008200900900
अहमदनगरउन्हाळीक्विंटल226410020001200
अकोला---क्विंटल73280016001200
अमरावतीलालक्विंटल57060015001050
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23403001400850
धुळेलालक्विंटल437150016351345
जळगावलालक्विंटल36100015001200
कोल्हापूर---क्विंटल728660023001400
नागपूरलालक्विंटल1102130016501588
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल7877949518871515
पुणे---क्विंटल1350130021001800
पुणेलोकलक्विंटल68075016001175
पुणेलालक्विंटल84930017001100
पुणेचिंचवडक्विंटल1550020001000
सांगलीलोकलक्विंटल520150021501325
सातारालोकलक्विंटल15100020001500
साताराहालवाक्विंटल123100018001800
सोलापूरलालक्विंटल2422110026001375
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)130934
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र