Join us

राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली, सकाळ सत्रात काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 1:45 PM

राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून 'इतक्या' क्विंटल कांद्याची आवक झाली.

मागील दिवसांपासून कांद्याची आवक घटत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत केवळ साठ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कालदेखील दोन वाजेपर्यंत एवढीच आवक झाली होती. आज सकाळ सत्रात लाल कांद्याला सरासरी 1150 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळाला आहे. 

आज 20 मार्च रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून 59 हजार 107 क्विंटल कांद्याची आवक झाली. सकाळ सत्रात पुणे बाजार समितीत 13 हजार 498 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यांनतर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 7000 क्विंटलपर्यंत आवक झाली.मागील तीन दिवसांपासून या बाजार समितीत उन्हाळ कांद्याची सरासरी एवढीच आवक होत असल्याचे दिसते आहे. आज सकाळच्या सत्रात लाल कांद्याला सरासरी 1150 रुपये तर उन्हाळ कांद्याला 1250 रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1270 इतका सर्वाधिक भाव मिळाला. नागपूर बाजार समितीत आलेल्या पांढऱ्या कांद्याला 1400रुपये असा दर मिळाला. कल्याण बाजार समितीत नंबर 1 कांद्याची आवक झाली, तर सरासरी 1450 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्या सरासरी 1200 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सकाळ सत्रातील दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/03/2024
अकलुज---क्विंटल58530017001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल184350016001050
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9051100015001250
सातारा---क्विंटल349100015001250
येवलालालक्विंटल200040013511050
येवला -आंदरसूललालक्विंटल40040012001150
लासलगावलालक्विंटल66350014001270
नागपूरलालक्विंटल2000100015001375
मनमाडलालक्विंटल200031012821050
देवळालालक्विंटल75050014001325
पुणेलोकलक्विंटल1349850015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17130016001450
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल1220110015001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल140040014141200
येवलाउन्हाळीक्विंटल400050013811250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल160040014001250
लासलगावउन्हाळीक्विंटल448860015511380
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल470060014001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700030015601375
टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डनाशिक