Join us

Onion Market : जुन्नर ओतूर बाजार उन्हाळ कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 7:55 PM

तर एकट्या भुसावळ बाजार समितीत आलेल्या लाल कांद्याला सरासरी इतक्या रुपयांचा दर मिळाला.

आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची 41 हजार क्विंटल ची आवक झाली. आज रविवार असल्याने निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले. उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 26 मे 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला 1500 रुपये ते 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर जुन्नर नारायणगाव आणि जुन्नर आळेफाटा या बाजार समितीमध्ये चिंचवड कांद्याची आवक झाली. या ठिकाणी अनुक्रमे 1800 रुपये ते 1600 रुपये असा दर मिळाला. तर एकट्या भुसावळ बाजार समितीत आलेल्या लाल कांद्याला सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला.

आज पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची 12 हजार 697 क्विंटलचे आवक झाली. या ठिकाणी लोकल कांद्याला सरासरी 1400 रुपयांचा दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 1200 रुपये पासून ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याची चांगली आवक झाल्याचे दिसून आले. शिवाय जुन्नर ओतूर बाजार समितीत सर्वाधिक 1900 रुपयांचा सरासरी दर मिळाला. त्याचबरोबर अकोले बाजार समितीत 1500 रुपये, पैठण बाजार समितीत 1200 रुपये, कोपरगाव बाजार समिती 1630 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/05/2024
दौंड-केडगाव---क्विंटल257540023001700
सातारा---क्विंटल311150020001750
राहता---क्विंटल279735022001500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2640024001800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5900100023101600
भुसावळलालक्विंटल34140017001600
पुणेलोकलक्विंटल1269770021001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल5645001400950
मंगळवेढालोकलक्विंटल7120014001200
अकोलेउन्हाळीक्विंटल212730023001500
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल4438120023001900
पैठणउन्हाळीक्विंटल132240018001200
कोपरगावउन्हाळीक्विंटल332850017261630
पारनेरउन्हाळीक्विंटल554430024001450
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेतकरी