Join us

Onion Market : लासलगाव, रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 7:50 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास 81 हजार क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास 81 हजार क्विंटलची आवक झाली. श्रीरामनवमी असल्याने बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवक घटल्याचे दिसून आले. आज कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 17 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या माहितीनुसार उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 55 हजार क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यात 30 हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1300 रुपये दर मिळाला. बारामती आणि भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याची आवक झाली. अनुक्रमे बारामती बाजार समितीत सरासरी 1000 रुपये तर भुसावळ बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला. 

सांगली फळे-भाजीपाला मार्केटला लोकल कांद्याला सरासरी 1050 रुपये तर पुणे पिंपरी बाजार समितीत सरासरी 1450 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला. लासलगाव बाजार समितीत 1400 रुपये दर मिळाला. पारनेर बाजार समितीत सरासरी 1300 रुपये तर रामटेक बाजार समितीत 1500 रुपये भाव मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/04/2024
अकलुज---क्विंटल40530015001000
कोल्हापूर---क्विंटल525860018001200
खेड-चाकण---क्विंटल4750100015001300
सातारा---क्विंटल303100015001250
बारामतीलालक्विंटल90030013501000
भुसावळलालक्विंटल43100015001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल540840017001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14130016001450
नाशिकउन्हाळीक्विंटल269470015001350
लासलगावउन्हाळीक्विंटल686870017861400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2200070015001400
संगमनेरउन्हाळीक्विंटल114252001701950
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल57572001600900
पारनेरउन्हाळीक्विंटल1573730016001300
रामटेकउन्हाळीक्विंटल4140016001500
टॅग्स :कांदाशेतीनाशिकमार्केट यार्डपुणे