Join us

Kanda Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 6:16 PM

Onion Market : आज काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 32 हजार 694 क्विंटलची आवक झाली.

Onion Market : आज रविवार असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव (Onion Auction) बंद होते. मात्र काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 32 हजार 694 क्विंटलची (ONion Rate) आवक झाली. तर आज लाल आणि उन्हाळ कांद्याचा सरासरी 1500 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या रामटेक बाजार समिती उन्हाळ कांद्याला (Summer Onion) तब्बल 4100 रुपयांचा दर मिळाला.

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दौंड केडगाव बाजारात 2500 रुपये, सातारा बाजारात 2750 रुपये तर राहता बाजारात 2550 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याची 14 क्विंटलची आवक झाली या कांद्याला सरासरी 2600 रुपयांचा दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याची 8515 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला 02 हजार रुपयांचा दर मिळाला. आज पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 5266 क्विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी 2500 रुपयांचा दर मिळाला. तर रामटेक बाजार समितीतून कांद्याची केवळ 42 क्विंटलची आवक झाली. मात्र कमीत कमी दर 04 हजार रुपये तर सरासरी दर 04 हजार 100 रुपयांपर्यंत मिळाला. 

असे आहेत बाजारभाव 

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/06/2024
अहमदनगर---क्विंटल329250033002550
अहमदनगरउन्हाळीक्विंटल5266100033002500
जळगावलालक्विंटल14220028002600
नागपूरउन्हाळीक्विंटल42400042004100
पुणे---क्विंटल10681170033002600
पुणेलोकलक्विंटल8876157528002188
पुणेचिंचवडक्विंटल4157120033002800
सातारा---क्विंटल364250030002750
सोलापूरलोकलक्विंटल265015001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)32694
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीनाशिक