Join us

Tomato Market : टोमॅटोची आवक वाढली, आज पुणे, कोल्हापूर बाजारात काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 4:20 PM

Tomato market : आता आवक वाढली असून छिंदवाडा, नाशिक व अन्य भागांतून टोमॅटो बाजारात येण्याची शक्यता आहे. 

गोंदिया : पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याने दरात कमालीची वाढ झाली होती. बाजारातील आवकसुद्धा घटली होती. मात्र, श्रावणमास सुरू होत असल्याने सध्या बाजारातील आवक वाढली असून, दरही उतरले असल्याचे चित्र आहे. आजच्या बाजारभाव अहवालानुसार आज रविवार रोजी टोमॅटोला क्विंटलमागे सरासरी 01 हजार रुपयांपासून ते 1750 रुपयांपर्यंत दर मिळाला.

मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दराने शंभरी गाठली होती. मात्र, या आठवड्यात दर ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. तर पुढे आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. श्रावणात भाजीपाला व फळांना मागणी वाढते. गणेशोत्सव, पुढे नवरात्र, दसऱ्यापर्यंत खप चांगलाच होतो. त्यामुळे नवीन भाज्या विक्रीला आल्या आहेत. येत्या आठवडाभरात स्थानिक भाज्याही विक्रीसाठी येतील. स्थानिक शेतकरी मुळा, मेथी, चवळी भाजी, दुधी भोपळा, काकडी, पडवळ, दोडके, गवार, भेंडी यांसारख्या भाज्यांची लागवड करीत असल्याने लवकरच विक्रीला येतील. 

टोमॅटोची आवक वाढली 

मागील काही दिवसांपर्यंत टोमॅटोचे दर चांगलेच वधारले होते. पावसामुळे आता फक्त कोणार्क येथून टोमॅटोची आवक होती. परिणामी टोमॅटोचे दर शंभर रुपयांवर गेले होते. मात्र, आता आवक वाढली असून छिंदवाडा, नाशिक व अन्य भागांतून टोमॅटो बाजारात येण्याची शक्यता आहे. 

आजचे टोमॅटो बाजारभाव 

आजचे सविस्तर बाजारभाव पाहिले असता कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला 01 हजार रुपये, सातारा बाजारात 1500 रुपये, तर राहता बाजारात 1100 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 1750 रुपये, पुणे-मोशी बाजारात 1500 रुपये, मंगळवेढा बाजारात 1500 रुपये, तर भुसावळ बाजारात वैशाली टोमॅटोला 1600 रुपये दर मिळाला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/08/2024
कोल्हापूर---क्विंटल22950015001000
सातारा---क्विंटल102100020001500
राहता---क्विंटल4150018001100
पुणेलोकलक्विंटल2448100025001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16150020001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल428100020001500
मंगळवेढालोकलक्विंटल5650018001500
भुसावळवैशालीक्विंटल60120018001600
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणेकोल्हापूर