Join us

टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 6:01 PM

आजच्या बाजार अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोला काय भाव मिळाला, ही जाणून घेऊया.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात टोमॅटो आणि द्राक्ष पीक घेतले जाते. यंदा अनेक पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आजच्या दर अहवालानुसार प्रति क्विंटल टोमॅटोला सरासरी 2200 रुपये बाजारभाव मिळाला. तर द्राक्षाला प्रति क्विंटल सरासरी 4 हजार रुपये बाजारभाव मिळाला. साधारण द्राक्षाला किलोमागे चाळीस रुपये दर मिळाला.  

टोमॅटोचे आजचे बाजारभाव 

आज 06 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार कोल्हापूर बाजार समितीत 189 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000    रुपये तर सरासरी 2100 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 103 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये तर सरासरी 2800 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. पुणे बाजार समितीत 1797 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2250 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. नागपूर बाजार समितीत 300 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1700 रुपये तर सरासरी 2300 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. 

आजचे द्राक्ष बाजारभाव 

आज 06 फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 90 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4000 तर सरासरी 6000 रुपयांचा दर मिळाला. मुंबई - फ्रुट मार्केटला केवळ 840 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 5 हजार रुपये तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 764 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 6 हजार 200 रुपये दर मिळाला. या नाशिक बाजार समितीत केवळ 15 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 3 हजार 200 रुपये दर मिळाला. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदाटोमॅटोद्राक्षे