Join us

टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 6:07 PM

द्राक्ष आणि टोमॅटो पिकाला आज कोणत्या बाजारसमितीत किती बाजारभाव मिळाला, जाणून घेऊया सविस्तर..

सद्यस्थितीत अनेक बाजारभाव घसरले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. कांद्यासोबत द्राक्ष पिकाने देखील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली आहे. एकीकडे द्राक्ष बागा काढणीला आल्या असताना केवळ 30 ते 40 रुपये किलोने द्राक्ष विक्री होताना दिसत आहे. दुसरीकडे टोमॅटो पिकाला आजच्या दर अहवालानुसार प्रति क्विंटलला सरासरी 2000 रुपये बाजारभाव मिळाला.

टोमॅटोचे आजचे बाजारभाव 

आज 09 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार संगमनेर    बाजार समितीत 12 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1100 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. कल्याण बाजार समितीत 03 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 3200 रुपये तर सरासरी 3300 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. पुणे बाजार समितीत 2563 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2000 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. नागपूर बाजार समितीत 400 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1800 रुपये तर सरासरी 2250 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला.

आजचे द्राक्ष बाजारभाव 

आज 09  फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार मुंबई - फ्रुट मार्केटला केवळ 875 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 5 हजार रुपये तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 814    क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 2000 रुपये तर सरासरी 5500 रुपये दर मिळाला. या नाशिक बाजार समितीत केवळ 28 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 3 हजार 200 रुपये दर मिळाला.

आजचे  द्राक्ष बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/02/2024
मुंबई - फ्रुट मार्केट---क्विंटल875500090007000
श्रीरामपूर---क्विंटल7250035003000
सोलापूरलोकलनग3840016001000
पुणेलोकलक्विंटल814200090005500
पुणे-मोशीलोकलक्विंटल85400040004000
नागपूरलोकलक्विंटल221400060005500
नाशिकनाशिकक्विंटल28160040003200
जळगावनाशिकक्विंटल30200040003000
टॅग्स :शेतीमार्केट यार्डद्राक्षेटोमॅटो