मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात आलेली तेजी आता थांबल्याचे दिसत आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत तुरीला सरासरी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचाच दर मिळत होता, मात्र हा दर हळूहळू कमी होत जाऊन दहा हजारांवर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून दरातील तेजी थांबली असताना बाजार समित्यांत तुरीची आवकही घटल्याचे चित्र दिसत आहे.
देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले असतानाच विदेशांतून आयातही कमी झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुरीच्या आणि तूरडाळीच्या मागणीतही वाढ झाली होती. परिणामी, तुरीच्या दरात अचानक तेजी सुरू झाली. गत आठवड्यात वाशीम जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर साडेबारा हजार रुपये प्रतिक्विंटलच्याही वर पोहोचले होते. तुरीच्या दरात वाढ झाल्याने तूर उत्पादकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत आठवडाभरापूर्वी तुरीचे दर १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मात्र गुरुवारी तुरीचे सरासरी कमाल दर ११ हजार ६०० रुपये प्रतिक्चेिटलवरच आले होते. अर्थात आठवडाभरात तुरीच्या दरात ९०० रुपयांची घसरण झाली.
तथापि, तुरीच्या दरातील ही तेजी आता थांबली असून, तुरीच्या दरात आता घसरण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. केवळ वाशीम जिल्ह्याचा विचार करता गुरुवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी 11 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे कमाल दर मिळाले. सद्यःस्थितीत बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसत असले तरी तुरीची मागणी कायमच आहे. मात्र तुरीच्या दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविली आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीची आवक निम्म्यावरच आली होती.
आज तुरीला काय दर मिळाला?
आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राज्यभरातील बाजार समितीमध्ये तुरीची केवळ आठ हजार क्विंटल पर्यंत अबक झालेली होती. यात अकोला बाजार समितीत सरासरी दहा हजार आठशे रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समितीत 11 हजार चारशे रुपये, बीड बाजार समितीत पांढऱ्या तुरीला दहा हजार दोनशे रुपये तर धाराशिव बाजार समितीत गज्जर तुरीला दहा हजार 88 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत लाल तुरीला 9 हजार 701 रुपये दर मिळाला. सर्वाधिक 11 हजार 300 रुपयांचा दर सोलापूर बाजार समितीत लाल तुरीला मिळाला आहे.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
19/04/2024 | ||||||
मुरुम | गज्जर | क्विंटल | 270 | 8701 | 11475 | 10088 |
अकोला | लाल | क्विंटल | 1930 | 8000 | 12125 | 10800 |
अमरावती | लाल | क्विंटल | 5124 | 11000 | 11800 | 11400 |
चाळीसगाव | लाल | क्विंटल | 30 | 9250 | 10296 | 9701 |
हिंगोली- खानेगाव नाका | लाल | क्विंटल | 87 | 10600 | 11300 | 10950 |
परतूर | लाल | क्विंटल | 13 | 9600 | 11000 | 10850 |
गंगाखेड | लाल | क्विंटल | 22 | 9500 | 10500 | 9800 |
चाकूर | लाल | क्विंटल | 9 | 9501 | 11121 | 10686 |
ताडकळस | लाल | क्विंटल | 28 | 10000 | 10000 | 10000 |
पालम | लाल | क्विंटल | 85 | 10500 | 10500 | 10500 |
दुधणी | लाल | क्विंटल | 346 | 11000 | 11610 | 11300 |
परतूर | पांढरा | क्विंटल | 9 | 10650 | 10850 | 10825 |
देउळगाव राजा | पांढरा | क्विंटल | 10 | 6000 | 9000 | 8500 |
तुळजापूर | पांढरा | क्विंटल | 12 | 10000 | 11201 | 11000 |