Join us

Tur Market : तुरीच्या दरातील तेजी अचानक थांबली, आज कुठे-काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 3:52 PM

तुर दरातील तेजी थांबली असताना बाजार समित्यांत तुरीची आवकही घटल्याचे चित्र दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात आलेली तेजी आता थांबल्याचे दिसत आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत तुरीला सरासरी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचाच दर मिळत होता, मात्र हा दर हळूहळू कमी होत जाऊन दहा हजारांवर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून दरातील तेजी थांबली असताना बाजार समित्यांत तुरीची आवकही घटल्याचे चित्र दिसत आहे.

देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले असतानाच विदेशांतून आयातही कमी झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुरीच्या आणि तूरडाळीच्या मागणीतही वाढ झाली होती. परिणामी, तुरीच्या दरात अचानक तेजी सुरू झाली. गत आठवड्यात वाशीम जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर साडेबारा हजार रुपये प्रतिक्विंटलच्याही वर पोहोचले होते. तुरीच्या दरात वाढ झाल्याने तूर उत्पादकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत आठवडाभरापूर्वी तुरीचे दर १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मात्र गुरुवारी तुरीचे सरासरी कमाल दर ११ हजार ६०० रुपये प्रतिक्चेिटलवरच आले होते. अर्थात आठवडाभरात तुरीच्या दरात ९०० रुपयांची घसरण झाली. 

तथापि, तुरीच्या दरातील ही तेजी आता थांबली असून, तुरीच्या दरात आता घसरण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. केवळ वाशीम जिल्ह्याचा विचार करता गुरुवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी 11 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे कमाल दर मिळाले. सद्यःस्थितीत बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसत असले तरी तुरीची मागणी कायमच आहे. मात्र तुरीच्या दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविली आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीची आवक निम्म्यावरच आली होती.

आज तुरीला काय दर मिळाला? आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राज्यभरातील बाजार समितीमध्ये तुरीची केवळ आठ हजार क्विंटल पर्यंत अबक झालेली होती. यात अकोला बाजार समितीत सरासरी दहा हजार आठशे रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समितीत 11 हजार चारशे रुपये, बीड बाजार समितीत पांढऱ्या तुरीला दहा हजार दोनशे रुपये तर धाराशिव बाजार समितीत गज्जर तुरीला दहा हजार 88 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत लाल तुरीला 9 हजार 701 रुपये दर मिळाला. सर्वाधिक 11 हजार 300 रुपयांचा दर सोलापूर बाजार समितीत लाल तुरीला मिळाला आहे. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/04/2024
मुरुमगज्जरक्विंटल27087011147510088
अकोलालालक्विंटल193080001212510800
अमरावतीलालक्विंटल5124110001180011400
चाळीसगावलालक्विंटल309250102969701
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल87106001130010950
परतूरलालक्विंटल1396001100010850
गंगाखेडलालक्विंटल229500105009800
चाकूरलालक्विंटल995011112110686
ताडकळसलालक्विंटल28100001000010000
पालमलालक्विंटल85105001050010500
दुधणीलालक्विंटल346110001161011300
परतूरपांढराक्विंटल9106501085010825
देउळगाव राजापांढराक्विंटल10600090008500
तुळजापूरपांढराक्विंटल12100001120111000
टॅग्स :शेतीमार्केट यार्डतुरावाशिमअकोला