Join us

Tur Market : तूर आवक मंदावली, क्विंटलमागे सरासरी बाजारभाव काय मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 6:46 PM

Tur Market : नवीन तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यास सहा महिन्यांचा कालावधी आहे.

भंडारा : महिन्याभरापूर्वी खरीप हंगामाला (Kharif Season) सुरुवात झाली आहे. तुरीची लागवड (Tur Cultivation) होऊन पीक फुटव्यांवर आहे. नवीन तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यास सहा महिन्यांचा कालावधी आहे. अशातच जुलै महिन्यात भंडारा व तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीचे दर १० हजार ४०० रुपयांवर गेले आहेत; परंतु सध्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही. त्यामुळे दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गतवर्षी भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) ९ हजार ४४५ हेक्टरवर सलग तसेच धुऱ्यांवर तूरपिकाची लागवड झाली होती. सुमारे ४०.८१ मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले. यंदा ११ हजार ४०० हेक्टरवर तूर लागवडीचे नियोजन असून ६८.४० मेट्रिक टन उत्पादनाचा लक्ष्यांक कृषी विभागाचा आहे. जून महिन्यात लागवड झालेली तूर दुसऱ्या वर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती येते. हलक्या प्रतीची म्हणजेच अल्पमुदतीची तूर असल्यास डिसेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या पदरी पडते. सध्या शेतकऱ्यांकडे जुनी तूर शिल्लक नाही. त्यामुळे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या उपयोगी न ठरता व्यापाऱ्यांच्या पदरी पडणारे आहे. 

आज काय भाव मिळतोय? 

आज राज्यातील बाजारात तुरीची 4 हजार 902 क्विंटलची झाली. तर सर्वसाधारण तुरीला सरासरी 8 हजार 600 रुपयांपासून ते 10 हजार 325 रुपयापर्यंत दर मिळाला. तर लाल तुरीला अकोला बाजारात 10 हजार 895 रुपये, अमरावती बाजारात 11हजार 188 रुपये, मालेगाव बाजारात 10 हजार 201 रुपये, नागपूर 11 हजार 50 रुपये, हिंगणघाट बाजारात 10 हजार 100 रुपये, अमळनेर बाजारात 10 हजार रुपये, मलकापूर बाजारात 10 हजार 690 रुपये,

चांदुर बजार बाजारात 10 हजार रुपये, औराद शहाजानी बाजारात 10950 रुपये, उमरगा बाजारात 10 हजार 500 रुपये, तर दर्यापूर बाजारात माहोरी तुरीला 11 हजार 200 रुपये तर जालना बाजारात पांढऱ्या तुरीला 10 हजार 150 रुपये, बार्शी बाजारात 11 हजार रुपये, गेवराई बाजारात 11 हजार रुपये, तर औराद शहाजानी बाजारात 11 हजार 200 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/07/2024
लासलगाव---क्विंटल1400186008600
राहूरी -वांबोरी---क्विंटल2103001030010300
कारंजा---क्विंटल52090251075010325
शिरुर---क्विंटल3800097009400
अकोलालालक्विंटल35498551170510895
अमरावतीलालक्विंटल669109001147611188
मालेगावलालक्विंटल1102011020110201
चोपडालालक्विंटल1985298529852
आर्वीलालक्विंटल28105001110010900
चिखलीलालक्विंटल249000106009800
नागपूरलालक्विंटल243103001130011050
हिंगणघाटलालक्विंटल81686001149010100
वाशीम - अनसींगलालक्विंटल12105001130011000
अमळनेरलालक्विंटल1100001000010000
चाळीसगावलालक्विंटल3850095009000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल39113001140011350
मलकापूरलालक्विंटल1020100001140010690
वणीलालक्विंटल41105051100510800
सावनेरलालक्विंटल64107751103510950
सेलुलालक्विंटल3796001080010500
चांदूर बझारलालक्विंटल7390001125010000
लोणारलालक्विंटल60100001159610798
मेहकरलालक्विंटल5095001099010300
औराद शहाजानीलालक्विंटल14105001140110950
उमरगालालक्विंटल2105001055010500
सेनगावलालक्विंटल269500105009700
मंगरुळपीरलालक्विंटल13890001120010850
मंगळूरपीर - शेलूबाजारलालक्विंटल18100001075010500
नेर परसोपंतलालक्विंटल37100001119510710
दुधणीलालक्विंटल52105001140011000
काटोललोकलक्विंटल795001050010000
दर्यापूरमाहोरीक्विंटल300104001130511200
जालनापांढराक्विंटल12670001112610150
बार्शीपांढराक्विंटल10110001100011000
गेवराईपांढराक्विंटल8290001091110000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल175500106007000
औराद शहाजानीपांढराक्विंटल11110001140111200
टॅग्स :तुरामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीभंडारा