तुरीच्या दराचा आलेख चढताच असून सोयाबीन मात्र जैसे थे परिस्थिती आहे. हमीभाव पेक्षाही कमी भाव सोयाबीनला मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र दुसरीकडे तुरीच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. आज जवळपास 17 हून अधिक बाजार समित्यांमध्ये दहा हजार रुपयांचा बाजारभाव तुरीला मिळाला तर सोयाबीनला सरासरी 4200 चा बाजार भाव मिळाला.
आजचे सोयाबीनचे बाजार भाव पाहिले असता हिंगोली बाजार समितीत 550 क्विंटल गज्जर तुरीची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 10 हजार 449 रुपये भाव मिळाला. सोलापूर बाजार समितीत 297 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 9300 तर सरासरी 09 हजार 700 रुपये बाजार भाव मिळाला. अकोला बाजार समितीत जवळपास 223 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी आठ हजार प्रती क्विंटल दर मिळाला, तर सरासरी 96 रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समिती 5850 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 9000 रुपये तर सरासरी 9750 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत 133 क्विंटल पांढरा पांढऱ्या तुरीची आवक झाली. या बाजार समितीत 9400 प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला तर सरासरी 10 हजार 33 रुपये भाव मिळाला.
आजचा सोयाबीनचा बाजार भाव पाहिला असता लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये 320 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी तीन हजार रुपयांचा दर तर सरासरी चार हजार 350 रुपयांचा दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत कमीत कमी चार हजार 250 तर सरासरी 4258 रुपयांचा दर मिळाला. धुळे बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनची 16 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत एक तीन हजार एकशे पाच रुपये तर सरासरी 3925 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत कमीत कमी चार हजार 475 रुपये तर सरासरी 4570 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत कमीत कमी चार हजार 100 तर सरासरी चार हजार 227 रुपये दर मिळाला. हिंगोली बाजार समितीत कमीत कमी चार हजार 100 तर सरासरी 04 हजार तीनशे आठ रुपये दर मिळाला. अकोला बाजार समितीत पिवळा सोयाबीनला कमीत कमी चार हजार दहा रुपये तर सरासरी 4300 रुपये दर मिळाला.