Tur, Soyabean Market : आज ज्वारीला (Sorghum) अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar) 2100 रुपये, अकोला बाजारात 2205 रुपये, अमरावती जिल्ह्यात 2125 रुपये, बीड जिल्ह्यात 2300 रुपये, बुलढाणा जिल्ह्यात 2660 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2500 रुपये, पुण्यात मालदांडी ज्वारीला 5500 रुपये, सांगली बाजारात शाळू ज्वारीला 04 हजार 200 रुपये, तर मुंबई बाजारात लोकल ज्वारीला 04 हजार 700 रुपये दर मिळाला.
अकोला बाजारात लाल तुरीला (Tur Bajarbhav) 10 हजार 393 रुपये, अमरावती बाजारात 10 हजार 43 रुपये, बीड बाजारात पांढऱ्या तुरीला 10 हजार रुपये, बुलढाणा बाजारात लाल तुरीला 09 हजार 900 रुपये, धाराशिव बाजारात गज्जर तुरीला 10 हजार 550 रुपये, हिंगोली बाजारात लाल तुरीला 10 हजार 300 रुपये, जालना बाजारात पांढऱ्या तुरीला 09 हजार 500 रुपये, मुंबई बाजारात सर्वसाधारण तुरीला सर्वाधिक 12 हजार 700 रुपये, नागपूर बाजारात लाल तुरीला 10 हजार 460 रुपये, तर यवतमाळ बाजारात लाल तुरीला 10451 रुपये दर मिळाला.
तर आज सोयाबीनला अहमदनगर बाजारात 4450 रुपये, अकोला आणि अमरावती बाजारात पिवळ्या सोयाबीनला 04 हजार 338 रुपये, बीड बाजारात 4450 रुपये बुलढाणा बाजारात 4350 रुपये, धाराशिव बाजारात 4550 रुपये, हिंगोली बाजारात 4524 रुपये, जळगाव बाजारात 04 हजार 151 रुपये, लातूर बाजारात 4518 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 400 रुपये तर नाशिक बाजारात 4580 रुपये दर मिळाला.