Join us

Tur, Soyabean Market : आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 19:58 IST

Tur, Soyabean Market : आज रविवारच्या दिवशी तूर, सोयाबीन आणि ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

Tur, Soyabean Market : आज हायब्रीड ज्वारीला (Sorghum) बुलढाणा बाजारात कमीत कमी 1700 रुपये तर सरासरी 1925 रुपये दर मिळाला. तर दौंड बाजारात पांढऱ्या ज्वारीला कमीत कमी 1700 रुपये तर सरासरी 2100 रुपयांचा दर मिळाला.

तुरीला (Tur) उदगीर बाजारात कमीत कमी 10 हजार 600 रुपये तर सरासरी 10 हजार 980 रुपयांचा दर मिळाला. तर बुलढाणा बाजारात लाल तुरीला कमीत कमी 9 हजार रुपये तर सरासरी 9650 रुपये दर मिळाला.

आज सोयाबीनला (Soyabean) सिल्लोड बाजारात कमीत कमी 04 हजार 300 रुपये तर सरासरी 04 हजार 400 रुपये,  उदगीर उदगीर बाजारात कमीत कमी 04 हजार 320 रुपये तर सरासरी चार हजार 335 रुपये दर मिळाला. बुलढाणा बाजारात पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 04 हजार शंभर रुपये दर मिळाला. तर देवणी बाजारात या सोयाबीनला सरासरी 04 हजार 429 रुपये दर मिळाला. 

असे आहेत बाजारभाव

शेतमाल : सोयाबिन

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/07/2024
सिल्लोड---क्विंटल51430044004400
उदगीर---क्विंटल1700432043504335
बुलढाणापिवळाक्विंटल70400042004100
देवणीपिवळाक्विंटल2544294429

4429

टॅग्स :सोयाबीनज्वारीबुलडाणामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती