Join us

Vegetables Market : कोथिंबीर, मेथीच्या जुडीला काय भाव,  वाचा किरकोळ बाजारातील बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 3:49 PM

बाजारात येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण घटल्याने दरात वाढ झाली आहे. पाहुयात आजचे भाजीपाला बाजारभाव...

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतीपिकावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या  भाज्यांचे प्रमाण घटल्याने दरात वाढ झाली आहे. पाहुयात आजचे भाजीपाला बाजारभाव...

गेल्या महिनाभरापासून आणि सद्यस्थितीत उष्णतेच्या लाटांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाई तसेच शेती पिकांना पाणी नसल्याने सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादन घटू लागलं आहे. परिणामी भाज्यांचे दर वधारले असल्याचे चित्र किरकोळ बाजारात दिसू लागले आहे. 

मेथी 30 रुपये जुडी

मेथी 10 ते 15 रुपयांची विकली जाणारी भाजी सद्यस्थितीत 20 ते 30 रुपयांपर्यंत विकली जात आहे. मार्चअखेरीस आल्याचा हंगाम संपतो. त्यामुळे नव्या आल्याची आवक सध्या सुरू झालेली नाही. त्यामुळे आलेही 120 रुपये किलोवर गेले आहे.

गेल्या महिन्यात लिंबूचे दर 170 रुपये किलो होते. तशातच नवा बहर आल्याने आणि ढगाळ वाता- वरणासह वादळ व अवकाळीचा फटका बसताच लिंबाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली.  परिणामी 20 रुपयांना तीन मिळणारे लिंबू आता 10 ला दोन मिळत आहेत. त्यामुळे बाजारात 160 रुपये किलो दराने लिंबू विकला जात आहे.

किरकोळ बाजारातील भाजीपाला दर

जर किरकोळ बाजारातील भाजीपाला दराचा विचार केला तर कांदा तीस रुपये किलो, बटाटा 30 रुपये किलो, कोबी नग 30 रुपये, टोमॅटो 20 रुपये किलो, काकडी 20 रुपये किलो, फ्लावर एक नग 40 रुपये, शेवगा 40 रुपये, वांगी पन्नास रुपये किलो, गाजर पन्नास रुपये किलो, आले 120 रुपये किलो, लिंबू 160 रुपये किलो, लसूण 160 रुपये किलो, वाटाणे 100 रुपये किलो, कोथिंबीर 100 रुपये जुडी, मेथी 60 रुपये जुडी....

लसूण व वाटाणे महागले; काहींचे दर नियंत्रणात

मालेगावी सोमवार बाजारात लसूण १६० रुपये किलो दराने विकला जात होता तर आले १२०, वाटाणे १०० रुपये किलो होते. काही पालेभाज्यांचे उत्पादन मालेगाव तालुक्यातून होत असल्याने काहीचे दर नियंत्रणात आहे. तर धुळे, जळगाव व नाशिकसह अन्य जिल्ह्यातून आयात होणाऱ्या भाज्यांसाठी खर्च अधिक येत असल्याने त्या भाज्या महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :शेतीमार्केट यार्डभाज्यानाशिकतापमान