Lokmat Agro >बाजारहाट > Watermelon Market : उन्हाचा तडाखा, टरबूज, खरबूजला पसंती, काय मिळतोय बाजारभाव? 

Watermelon Market : उन्हाचा तडाखा, टरबूज, खरबूजला पसंती, काय मिळतोय बाजारभाव? 

Latest News Today's watermelon and melon market prices check here | Watermelon Market : उन्हाचा तडाखा, टरबूज, खरबूजला पसंती, काय मिळतोय बाजारभाव? 

Watermelon Market : उन्हाचा तडाखा, टरबूज, खरबूजला पसंती, काय मिळतोय बाजारभाव? 

राज्यातील उष्ण वातावरणात बाजारपेठेत टरबूज, खरबूजाला मागणी वाढली आहे.

राज्यातील उष्ण वातावरणात बाजारपेठेत टरबूज, खरबूजाला मागणी वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या उन्हाचा पारा  (Temperature) 42 अंशांच्या पुढे गेला असून सकाळपासूनच अंगाची लाहीलाही होत आहे. अशा उष्ण वातावरणात बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. टरबूज 13 ते 15 रुपये, खरबूज 25 रुपये किलो दराने  विक्री होत आहे. ग्राहकांनी टरबूज व (Watermelon)  खरबुजाला प्रथम पसंती दिली असून, असह्य उष्णतेत फळांनाच ग्राहकांची आवड वाढली आहे.

शेतकरी वातावरणाचा अभ्यास घेऊन फळबागायतीचे (Fruit Farming)  नियोजन हिशेबाने आखत आहेत. अलीकडे टरबुजाची शेती सरसावलेली आहे. शेतकरी फळबागायतीसह भाजी उत्पादनाकडे वळलेला आहे. कृषी विभाग, कृषी मित्र व व्यापारी यांच्या संयुक्त सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी फळबागायतीकडे क्रमाक्रमाने बढ़तीवर आहे. प्रत्येक हंगामात ग्राहकांना पसंतीला पडलेला भाजीपाला अथवा फळ उत्पादनाकडे शेतकरी झुकलेला आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून टरबुजाचे उत्पादन सुरू आहे. अगदी आरंभाला टरबुजाला १२ रुपयांपासून दर मिळालेला आहे. 

असह्य उन्हाळ्यात फळांना मोठी मागणी आहे. टरबूज व खरबूज दोन्ही फळांना शनिवारी अगदी सकाळीच ग्राहकांनी चांगली पसंती दिले. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला. टरबूज १३ ते १४ रुपये व खरबूज २५ ते ३० रुपये किलोपर्यंत विकला. दोन एकरांत टरबुजाचे उत्पादन घेतले. दर दहा ते बारा रुपयांच्या दरम्यान मिळाला. भात शेतीपेक्षा निश्चितच फळबागायती फलदायी ठरली. पालांदूर येथील स्थानिक बाजारपेठेत टरबुजाला मोठी मागणी आहे. स्थानिकच्या व्यापाऱ्यांनी थेट शेतावर येऊन टरबूज विकत घेतले.

-मोरेश्वर सिंगनजुडे, बागायतदार, कोलारी/पळसगाव

आजचे टरबूज, खरबूज बाजारभाव

आज खरबूजास छत्रपती संभाजी नगर बाजार समिती क्विंटलमागे 1850 रुपये, तर मुंबई फ्रुट मार्केटमध्ये 2500 रुपये तर नाशिकच्या बाजार समितीत नंबर एकच्या खरबुजास 1800 रुपयांचा दर मिळाला. तर टरबूज आला छत्रपती संभाजी नगर बाजार समिती क्विंटल मागे 850 रुपये, राहता बाजार समिती 800 रुपये, तर नाशिक बाजार समिती नऊशे रुपयांचा दर मिळाला.


 

Web Title: Latest News Today's watermelon and melon market prices check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.