Join us

Wheat Market : पैठण बाजार समितीत बन्सी गव्हाला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 7:21 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 314 क्विंटलची आवक झाली. बाजारभाव पाहुयात..

आज राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 314 क्विंटलची आवक झाली. यात 2189, हायब्रीड, बन्सी, अर्जुन या सगळ्या गव्हाच्या वाणांची आवक झाली. आज गव्हाला सरासरी 2300 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 19 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार शेवगाव बाजार समितीत 21 89 गव्हाची 27 क्विंटल तर दौंड बाजार समिती 86 क्विंटल आवक झाली. शेवगाव बाजार समितीत 2800 रुपये असा सर्वाधिक भाव मिळाला. तर दौंड बाजार समितीत 2750 रुपये दर मिळाला. त्यानंतर अर्जुन गव्हाची सिल्लोड बाजार समिती 64 क्विंटलची आवक झाली. या गव्हाला सरासरी 2400 रुपयांचा दर मिळाला.

तर पैठण बाजार समितीत बन्सी गव्हाची 37 क्विंटल ची आवक झाली. या गव्हा ला  सरासरी 2752 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर बुलढाणा बादल समितीत हायब्रीड गव्हाची 100 क्विंटलचे आवक झाली. या गव्हाला कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2300 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत गव्हाचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/05/2024
अहमदनगर२१८९क्विंटल27230028002800
बुलढाणाहायब्रीडक्विंटल100200026002300
छत्रपती संभाजीनगरबन्सीक्विंटल37235030002752
छत्रपती संभाजीनगरअर्जुनक्विंटल64220026002400
पुणे२१८९क्विंटल86220028502750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)314
टॅग्स :गहूमार्केट यार्डपैठणशेती क्षेत्र