Join us

Wheat Market : राज्यात शरबती गहू टॉपवर, काय मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 5:06 PM

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढली असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यत 15 हजार क्विंटल आवक झाली.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढली असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यत 15 हजार क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारण गव्हासह २१८९, बन्सी, लोकल, हायब्रीड, नंबर एक आणि शरबती गव्हाची आवक झाली. आज गव्हाला सरासरी 2200 रुपयापासून ते 4700 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. आज देखील शरबती गव्हाला सर्वाधिक 4700 रुपये बाजारभाव मिळाला. 

आज 19 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये गव्हाची आवक झाली. आज सर्वाधिक 9767 क्विंटल लोकल गव्हाची आवक मुंबई बाजार समितीत झाली. करमाळा बाजार समितीत सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2612 रुपये दर मिळाला. परतूर बाजारसमितीत २१८९ गव्हाला 2180 रुपये मिळाला. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

पैठण    बाजार समितीत बन्सी गव्हाला सरासरी 2900 रुपये दर मिळाला. गंगापूर बाजार समितीत हायब्रीड गव्हाला सरासरी 2450 रुपये दर मिळाला. लोकल गव्हाला सरासरी 2250 रुपयांपासून ते 4550 रुपये दर मिळाला. लोकल गव्हाला सर्वाधिक दर मुंबई बाजारात मिळाला. त्यानंतर शरबती गव्हाला आज पुणे बाजारात सर्वाधिक 4700 रुपये बाजारभाव मिळाला. 

असे आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/04/2024
दोंडाईचा - सिंदखेड---क्विंटल2261226122612
करमाळा---क्विंटल1220022002200
राहता---क्विंटल44241126002505
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल13250026002600
परतूर२१८९क्विंटल6200022502180
दुधणी२१८९क्विंटल15320035003500
पैठणबन्सीक्विंटल115245332612900
गंगापूरहायब्रीडक्विंटल53232528502450
अकोलालोकलक्विंटल302207529052480
अमरावतीलोकलक्विंटल1090250028002650
धुळेलोकलक्विंटल175229033002855
सांगलीलोकलक्विंटल610300039003450
यवतमाळलोकलक्विंटल73210024002250
चिखलीलोकलक्विंटल150210025002300
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल19230023502325
मुंबईलोकलक्विंटल9767260065004550
चाळीसगावलोकलक्विंटल50220028002311
गेवराईलोकलक्विंटल42231231812750
गंगाखेडलोकलक्विंटल25240028002500
देउळगाव राजालोकलक्विंटल25220029002700
लोणारलोकलक्विंटल200200032002600
मेहकरलोकलक्विंटल120200028002400
उल्हासनगरलोकलक्विंटल850320036003400
सिंदीलोकलक्विंटल15023050
ताडकळसनं. १क्विंटल20250027002500
सोलापूरशरबतीक्विंटल1010254038003080
अकोलाशरबतीक्विंटल250270035003200
पुणेशरबतीक्विंटल412420052004700
कल्याणशरबतीक्विंटल3280031002950
टॅग्स :शेतीगहूमार्केट यार्डपुणेमुंबई