Join us

Wheat Market : कुठल्या गव्हाला कुठे-काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 6:31 PM

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 1688 क्विंटल ची आवक सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 1688 क्विंटल ची आवक सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत झाली. आज गव्हाला सरासरी 1800 रुपयांपासून ते 4 हजार 900 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज सर्वाधिक 7 हजार क्विंटलची लोकल गव्हाची आवक झाली.

आज 14 मे 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2280 रुपये ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला त्यानंतर अमरावती बाजार समितीत गव्हाच्या 147 या वाणाला 2400 रुपये दर मिळाला. गव्हाच्या 2189 या वाणाला सरासरी 1800 रुपये 4 हजार 555 रुपये दर मिळाला. याच वाणाला लासलगाव निफाड बाजार समितीत सरासरी 2426 रुपये दर मिळाला. एकट्या सिल्लोड बाजार समितीत अर्जुन गव्हाला सरासरी 2500 रुपये दर मिळाला.

पैठण बाजार समितीत बन्सी गव्हाला सरासरी 2701 रुपये दर मिळाला. तर लोकल गव्हाला सरासरी 2000 रुपये ते 4 हजार 550 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समिती शरबती गावाला 3115 तर पुणे बाजार समिती सर्वाधिक 4 हजार 900 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/05/2024
अहमदनगर---क्विंटल34245126832574
अकोलालोकलक्विंटल644199526782470
अमरावतीलोकलक्विंटल1095238525352460
अमरावती१४७क्विंटल3235024502400
बीडलोकलक्विंटल140199931002800
भंडारा२१८९क्विंटल5220024002300
बुलढाणालोकलक्विंटल308210026292377
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल16210024012250
छत्रपती संभाजीनगरबन्सीक्विंटल84230031022701
छत्रपती संभाजीनगरअर्जुनक्विंटल53240026002500
धाराशिवलोकलक्विंटल2276027602760
धाराशिव२१८९क्विंटल10180018001800
धुळे---क्विंटल159220028002651
धुळेलोकलक्विंटल120230032002950
जळगाव---क्विंटल80241029002651
जळगावलोकलक्विंटल260234728072500
जालना---क्विंटल54205132812779
जालनालोकलक्विंटल110220026002400
लातूरलोकलक्विंटल3210032512675
लातूर२१८९क्विंटल9250045714555
मंबईलोकलक्विंटल7555260065004550
नागपूर---क्विंटल97223023132280
नागपूरलोकलक्विंटल789250028762775
नांदेडलोकलक्विंटल6185021002000
नाशिकलोकलक्विंटल70190025212400
नाशिक२१८९क्विंटल120224827662462
पालघर---क्विंटल60345034503450
पुणेशरबतीक्विंटल405400058004900
सांगलीलोकलक्विंटल20335036403520
सोलापूर---क्विंटल2280030012800
सोलापूरशरबतीक्विंटल890254539003115
वर्धालोकलक्विंटल8021000
वाशिम---क्विंटल3000230027552545
वाशिम२१८९क्विंटल600225025002400
यवतमाळलोकलक्विंटल77241326802551
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)16888
टॅग्स :गहूमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र