Join us

Tomato Market : टोमॅटो आवकेत 23 टक्के, तर किंमतीत 4 टक्क्यांची घट, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 2:49 PM

Tomato Market : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावामुळे काहीसा दिलासा मिळत होता. मात्र पुन्हा एकदा टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे.

Tomato Market : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato Farmer) बाजारभावामुळे काहीसा दिलासा मिळत होता. मात्र पुन्हा एकदा टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. टोमॅटोच्या पुणे बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती ३१०० रुपये प्रति क्विंटल होत्या. किंमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घट झाली आहे.

देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या (tomato Market) आवक मध्ये २३.८ टक्केनी घट झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यापासून टोमॅटोच्या अकेमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ८० ते ८५ टनांपर्यंत देशांतर्गत बाजारपेठांमध्ये आवक होत होती. मात्र हीच आवक आता २० टनांपर्यंत येऊन पोहोचले आहे. तर राज्यातील बाजारात १० टनांपर्यंत आवक पोहचली आहे. 

प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती ५२३३ रुपये प्रति क्विंटल होत्या. तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमती २४०० रुपये प्रति क्विंटल होत्या. यात पुणे बाजारात ०3 हजार १०० रुपये, मुंबई बाजारात ५ हजार २३३ रुपये, नारायणगाव बाजारात ४७५० रुपये, संगमनेर बाजारात ३०३७ रुपये, तर सोलापूर बाजारात २४०० रुपये असा दर मिळाला. 

आज बाजारभाव कसे आहेत? 

दुपारी तीनपर्यंत पुणे बाजारात प्रतिक्विंटल २५०० रुपये, कोल्हापूर बाजारात ०३ हजार रुपये, सातारा बाजार ०४ हजार ५०० रुपये, पनवेल बाजारात ०५ हजार ५०० रुपये, तर भुसावळ बाजारात २५०० रुपये दर मिळाला.

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे