Tomato Market : सध्या टोमॅटो उत्पादक (Tomato Farmer) शेतकऱ्यांना दिलासा देणारे बाजारभाव असल्याचे चित्र आहे. टोमॅटोच्या वीस किलोच्या कॅरेटला ९०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. तर सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली बाजारात तब्बल २१०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. या बाजारात टोमॅटो लिलाव सुरु झाले असून आवक देखील वाढली आहे.
मध्यतंरी टोमॅटोच्या दरात (Tomato Bajarbhav) चांगलीच घसरण झाली होती. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. मात्र मागील दोन आठवड्यापासून टोमॅटो दराचा आलेख वाढत आहे. त्यातही पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापूर्वीच पाऊस नसल्याने वातावरणचा फटका टोमॅटो शेतीला बसला होता. अशातच काही भागातून आवक झालेल्या टोमॅटोला चांगला भाव मिळू लागला आहे. तर काही भागात शेतकरी टोमॅटो पीक वाचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. आजमितीस कमीत कमी ८०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत प्रति कॅरेटला दर मिळतो आहे.
दरम्यान सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sinnar Tomato Market) पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजारात टोमॅटो लिलाव सुरू झाले. पहिल्याच दिवशी सुमारे साडेचार हजार क्रेट टोमॅटोची आवक झाली. २० किलोच्या क्रेटला २१०० रुपयांचा भाव मिळाला. उपबाजारात आलेल्या टोमॅटोला सरासरी ८० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला, पांढुर्ली येथील शेतकरी रंगनाथ केरू जाधव २१ टोमॅटो जाळ्यांना खरेदीदार प्रवीण चव्हाणके यांनी विक्रमी २१०० रुपये प्रती २० किलो क्रेटला दर दिला. पहिल्याच दिवशी सुमारे ४५०० जाळ्यांची अर्थात ९०० क्विंटल टोमॅटोची आवक झाली.
आजचे टोमॅटो बाजारभाव (क्विंटलप्रमाणे)आज खेड चाकण बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल ०४ हजार ५०० रुपये, श्रीरामपूर बाजारात ०४ हजार रुपये, पुणे बाजारात २७५० रुपये, वाई बाजारात ४००० रुपये, कामठी बाजारात ०६ हजार रुपये, रत्नागिरी बाजारात ०४ हजार ५०० रुपये आणि इस्लामपूर बाजारात ०३ हजार ३०० रुपये दर मिळाला. तर काळ काल पिंपळगाव बसवंत मार्केटला कॅरेटला १०५१ रुपयांचा दर मिळाला.