Join us

Tomato Market : टोमॅटोचे बाजारभाव उतरतेच, पुण्यात आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 6:57 PM

Tomato Market : ऐन दिवाळीत (Diwali) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. (Tomato Market Down)

Tomato Market : ऐन दिवाळीत (Diwali) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. मागील महिन्यांपासून टोमॅटोची लाली (Tomato Market Down) उतरली असून आजमितीस कॅरेटला केवळ ३०० ते ४०० रुपये रुपये दर मिळतो आहे. तर आज क्विंटलमागे कमीत कमी १६०० रुपयांपासून ते सरासरी २९०० रुपयांपर्यंत दर मिळाला. म्हणजेच कॅरेटला २५० ते ३०० रुपये मिळतो आहे. 

आज ०३ नोव्हेंबर रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात ३ हजार ९११ क्विंटल टोमॅटोची (Tomato Arrival) आवक झाली. तर पुणे बाजारात सर्वाधिक लोकल टोमॅटोची आवक झाली. तर कमीत कमी १ हजार रुपये ते १७५० रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे- खडकी बाजारात कमीत कमी १२०० रुपये ते सरासरी १६०० रुपये दर मिळाला. तर पुणे-पिंपरी बाजारात सरासरी २५०० रुपये दर मिळाला. 

भुसावळ बाजारात वैशाली टोमॅटोला (Bhusaval Tomato Market) कमीत कमी २५०० रुपये तर सरासरी २९०० रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात लोकल टोमॅटोला १४०० रुपये तर सरासरी २५०० रुपये दर मिळाला. कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी २ हजार रुपये दर मिळाला. राहता बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी २५०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/11/2024
अहमदनगर---क्विंटल14100040002500
जळगाववैशालीक्विंटल26250034002900
कोल्हापूर---क्विंटल108100030002000
पुणे---क्विंटल465270036003200
पुणेलोकलक्विंटल3267156723331950
सोलापूरलोकलक्विंटल31140033002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3911
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे