Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : एका महिन्यात टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या, वाचा सविस्तर 

Tomato Market : एका महिन्यात टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या, वाचा सविस्तर 

Latest News Tomato Market Tomato prices fell by 22 percent in one month, read more details | Tomato Market : एका महिन्यात टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या, वाचा सविस्तर 

Tomato Market : एका महिन्यात टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या, वाचा सविस्तर 

Tomato Market :14 नोव्हेंबर 2024 रोजी टोमॅटोला 52.35 रुपये प्रति किलो होती. तर दुसरीकडे 14 ऑक्टोबर 2024 रोजी 67.50 रुपये प्रति किलो इतकी होती.

Tomato Market :14 नोव्हेंबर 2024 रोजी टोमॅटोला 52.35 रुपये प्रति किलो होती. तर दुसरीकडे 14 ऑक्टोबर 2024 रोजी 67.50 रुपये प्रति किलो इतकी होती.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : टोमॅटोच्या दरात (Tomato Bajarbhav) सातत्याने घसरण सुरु असून बाजारात भाव कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारातही दर कमी होत आहेत. 14 नोव्हेंबर 2024 रोजी अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 52.35 रुपये प्रति किलो होती. तर दुसरीकडे 14 ऑक्टोबर 2024 रोजी 67.50 रुपये प्रति किलो इतकी होती. यानुसार जवळपास महिनाभरात 22.4 टक्के घसरण झाली आहे. 

कृषी विभागाच्या (Agriculture Department) तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2023-24 मध्ये टोमॅटोचे एकूण वार्षिक उत्पादन 213.20 लाख टन आहे, जे 2022-23 मधील 204.25 लाख टनांपेक्षा 4 टक्के अधिक आहे. टोमॅटोचे उत्पादन वर्षभर होत असले, तरी उत्पादन क्षेत्र आणि उत्पादनाच्या प्रमाणात हंगामी फरक असतो. टोमॅटो पिकाची (Tomato Market) प्रतिकूल हवामानाची उच्च संवेदनशीलता आणि पुरवठ्यातील किरकोळ व्यत्यय आणि फळे लवकर खराब होण्याची प्रवृत्ती यांचा किमतीवर मोठा परिणाम होतो. ऑक्टोबर 2024 मध्ये टोमॅटोच्या किमतीत झालेली वाढ आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये जास्त आणि दीर्घकाळ पडलेल्या पावसामुळे झाली.

महिनाभरातील बदलते बाजारभाव 

 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत, टोमॅटोची आवक वाढल्यामुळे आझादपूर मंडईतील सरासरी किमती 5 हजार 883 रुपये प्रति क्विंटलवरून 2 हजार 969 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जवळपास 50 टक्क्यांनी घसरल्या. पिंपळगाव, मदनपल्ले आणि कोलार यांसारख्या बेंचमार्क मार्केटमधूनही मंडीच्या दरात अशीच घसरण नोंदवली गेली आहे.भारतातील विविध क्षेत्रांमध्ये टोमॅटोच्या उत्पादनावरील सामान्य हंगामी परिणाम दर्शविते की टोमॅटो उत्पादक प्रमुख राज्यांमध्ये पेरणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होते. मात्र, पिकाच्या लागवडीला कमी कालावधी असल्याने आणि फळांची एकापेक्षा जास्त काढणी होत असल्याने बाजारात टोमॅटोची सतत उपलब्धता असते.

हंगामी आवकेमुळे दर घसरले 

मदनप्पल आणि कोलार या प्रमुख टोमॅटो हबमध्ये आवक घटली असली तरी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमधून हंगामी आवक झाल्यामुळे दर घसरले आहेत. देशभरातील टोमॅटोच्या पुरवठ्यातील कमतरता सध्याची हंगामी आवक पूर्ण करत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंतचे हवामान देखील पिकासाठी आणि शेतातून ग्राहकांपर्यंत पुरवठा चांगला राहण्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा : Weekly Kanda Market : सोलापूर, नाशिक बाजारात कांदा दरात 'इतकी' घसरण, वाचा मागील आठवड्यातील दर
 

Web Title: Latest News Tomato Market Tomato prices fell by 22 percent in one month, read more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.