Join us

Tomato Market : टोमॅटोचे भाव का उतरले आहेत? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 6:47 PM

Tomato Market : टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असून आजघडीला किलोमागे दहा आणि 15 रुपये दर मिळत असल्याचे चित्र आहे.

Tomato Market :  टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण (Tomato Market Down) झाली असून मागील महिन्यातील आकडेवारी पाहिली असता टोमॅटोला प्रतिक्विंटल 2800 रुपये ते 3 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र आजमितीस क्विंटलमागे सरासरी 1000 ते 1500 रुपयांचा दर मिळत आहे. जवळपास किलोमागे 50 ते 60 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येते.

जूनच्या शेवटी आणि जुलै च्या सुरुवातीपासून टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळू लागला होता. जवळपास 2800 रुपयांपासून ते 03 हजार 800 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण होण्यास सुरुवात झाली. कारण याच आठवड्यात टोमॅटोच्या आवकेत देखील वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी टोमॅटोच्या आवकेत देशभरात जवळपास 3.9% नी वाढ झाल्याचे बाजार माहिती विश्लेषण अहवालात स्पष्ट झाले आहे. 

टोमॅटोची आवक वाढली.... 

टोमॅटो आवकेची मागील पाच दिवसांची आकडेवारी पाहिली असता 24 ऑगस्ट रोजी 34 हजार क्विंटल, 25 ऑगस्ट रोजी 33 हजार क्विंटल, 26 ऑगस्ट रोजी 41 हजार क्विंटल, 27 ऑगस्ट रोजी 48 हजार क्विंटल, 28 ऑगस्ट रोजी 49 हजार क्विंटल, 29 ऑगस्ट रोजी 57 हजार क्विंटल, 30 ऑगस्ट रोजी 52 हजार क्विंटल अशी टोमॅटो आवकेत वाढ झाल्याचे दिसून येते.

आजचे टोमॅटोचे बाजारभाव पाहुयात

कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला केवळ 900 रुपये दर मिळाला. सातारा बाजारात 1250 रुपये तर राहता बाजारात 1700 रुपये दर मिळाला. रामटेक बाजारात हायब्रीड टोमॅटोला 1900 रुपये, पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 1200 रुपये तर भुसावळ बाजारात वैशाली टोमॅटोला 1200 रुपये दर मिळाला. आज 01 हजार रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र