Join us

Tomato Market : टोमॅटो आवकेत 8 टक्क्यांची घट, मागील आठवड्यात काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 6:42 PM

Tomato Market : मागील आठवड्यात टोमॅटोच्या किमती सरासरी 1570 रुपये प्रति क्विंटल होत्या.  

Tomato Market : मागील आठवड्यात टोमॅटोचे आवकेत (Tomato Market) घसरण पाहायला मिळाली.  बाजार भाव समाधानकारक असल्याचे चित्र आहे. मात्र आजच्या बाजारभावाच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आलं. मागील आठवड्यात टोमॅटोच्या किमती सरासरी 1570 रुपये प्रति क्विंटल होत्या.  

टोमॅटोच्या पुणे बाजारातील (Pune Tomato Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु.१५७० प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ५ टक्केनी वाढ झाली आहे.देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये ८.६ टक्केनी घट झाली आहे. प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती (रु.२२२५/क्वि.) होत्या तर सोलापूर बाजारात कमी किंमती (रु. ११६०/ क्वि.) होत्या. मागील सप्ताहातील बाजारभाव पाहिले असता पुणे बाजारात 1570 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजारात 2225 रुपये प्रति क्विंटल, नारायणगाव बाजारात 02 दोन हजार रुपये प्रति क्विंटल, संगमनेर बाजारात 1700 रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर बाजार 1160 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

आजचे टोमॅटो बाजारभाव 

आजचे बाजार भाव पाहिले असता टोमॅटोला क्विंटल मागे कोल्हापूर बाजारात प्रतिक्विंटल 1200 रुपये, अहमदनगर बाजारात प्रतिक्विंटल 1650 रुपये, सातारा बाजारात प्रतिक्विंटल 2500 रुपये तर पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला प्रतिक्विंटल 1500 रुपये, कल्याण बाजारात जवळपास 03 हजार रुपये, पुणे बाजारात लोकल टोमेटोला क्विंटल मागे 02 हजार रुपये, नागपूर बाजारात प्रतिक्विंटल 1875 रुपये दर मिळाला.

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे