Lokmat Agro >बाजारहाट > Tur, Harbhara Market : आगामी काळात तूर, हरभरा पिकांना काय बाजारभाव मिळतील? जाणून घ्या सविस्तर 

Tur, Harbhara Market : आगामी काळात तूर, हरभरा पिकांना काय बाजारभाव मिळतील? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Tur, Harbhara Market What will be market prices of Tur, Harbhara crops in future Know in detail  | Tur, Harbhara Market : आगामी काळात तूर, हरभरा पिकांना काय बाजारभाव मिळतील? जाणून घ्या सविस्तर 

Tur, Harbhara Market : आगामी काळात तूर, हरभरा पिकांना काय बाजारभाव मिळतील? जाणून घ्या सविस्तर 

Tur, Harbhara Market : पुढील कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

Tur, Harbhara Market : पुढील कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur, Harbhara Market : सद्यस्थितीत खरीप हंगामातील (Kharif Season) तूर पिकासह रब्बी हंगामातील हरभरा पीक (Harbhara Market) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या दोन्ही पिकांचा अंदाजे बाजारभाव पाहिला असता तूर पिकाला क्विंटलमागे कमीत कमी ९ हजार रुपये तर सरासरी १० हजार ५०० रुपये तसेच हरभरा पिकाला क्विंटलमागे कमीत कमी ६ हजार ५०० रुपये तर सरासरी ८ हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. 

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील (Smart Project) “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. दुसरीकडे एकीकडे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच रब्बी हंगामातील पिकांमधून ही  काढण्यासाठी शेतकरी झटत आहेत. 

आता या बाजार अहवालानुसार जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत मका पिकाला क्विंटलमागे (Maize Market) कमीत कमी २ हजार रुपये तर सरासरी २५०० रुपये, सोयाबीन पिकाला कमीत कमी ४ हजार ४०० रुपये ते सरासरी ५००० रुपये आणि कापूस पिकाला क्विंटलमागे कमीत कमी ७५०० रुपये ते सरासरी ८५०० रुपये या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

सोयाबीन, कापूस उत्पादक हैराण 
एकीकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावामुळे चिंतेत आहेत. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापूस साठवणुकीवर शेतकरी भर देत आहेत. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू आदींसह इतर पिकांची लागवड सुरु आहे. त्यामुळे या पिकांना तरी अपेक्षित बाजारभाव मिळेल का? अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. 

Sugar Market : एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेवर काय होईल परिणाम

Web Title: Latest News Tur, Harbhara Market What will be market prices of Tur, Harbhara crops in future Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.