Tur, soyabean Market : आज 06 ऑगस्ट 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ज्वारीची (Sorghum Market) 8 हजार 715 क्विंटल, तुरीची 03 हजार 317 क्विंटल तर सोयाबीनची 16 हजार 410 क्विंटलची आवक झाली.
आज ज्वारीला सरासरी 1902 रुपयापासून ते 04 हजार 100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात मालदांडी ज्वारीला पुणे बाजारात 5300 रुपये, पांढऱ्या ज्वारीला तुळजापूर बाजारात 2850 रुपये, दादर ज्वारीला अमळनेर बाजारात 2625 रुपये दर मिळाला.
आज तुरीला (Tur Bajarbhav) सरासरी 08 हजार शंभर रुपयांपासून ते 10 हजार 652 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात अहमदनगर बाजारात सर्वसाधारण तुरीला 09 हजार 750 रुपये, हिंगोली बाजारात गजर तुरीला 10 हजार 552 रुपये, सोलापूर बाजारात लाल तुरीला 10 हजार रुपये, वर्धा बाजारात लोकल तुरीला 10 हजार 580 रुपये तर गेवराई बाजारात पांढऱ्या तुरीला 10 हजार 200 रुपयांचा दर मिळाला.
आज सोयाबीनला (Soyabean Market) अहमदनगर बाजारात 4250 रुपये, धुळे बाजारात 4 130 रुपये, अमरावती बाजारात लोकल सोयाबीनला 4 हजार 142 रुपये, लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला 4 हजार 262 रुपये, अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला 04 हजार 200 रुपये असा दर मिळाला. तर एकूण दिवसभरात सोयाबीनला 3600 रुपयांपासून ते 4 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.