Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market :ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये तुरीला काय भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Tur Market :ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये तुरीला काय भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Turi market prices be in October to December 2024 Know in detail  | Tur Market :ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये तुरीला काय भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Tur Market :ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये तुरीला काय भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Tur Bajarbhav : गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहिला असे गृहीत धरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tur Bajarbhav : गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहिला असे गृहीत धरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Future Market : भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक (Tur Market) देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात (Tur Import) कोटा मर्यादित ठेवलेला आहे. विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFT) ने प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार तूरीसाठीचे - मुक्त आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे.

तूर हे खरीप पिक (Kharif Crop) असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३३.३९ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ८.६ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये ८.७ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तर माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष मार्च २०२३-२४ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. जुलै २०२४ (१५ जुलै २०२४ पर्यंत) मध्ये १.८ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ४.१ लाख टन होती. तसेच मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात कमी झालेली आहे.

संभाव्य किमती कशा असतील?
डिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणेः

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ : रु. ५ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ : रु.७ हजार १८४ रुपये प्रति क्विंटल

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ : रु. १० हजार ७२ रुपये प्रति क्विंटल

सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती जास्त आहेत. महाराष्ट्रातील लातूर बाजाराचा विचार केला तर लातूर बाजारात ऑक्टोंबर ते डिसेंबर 2024 या दरम्यान ०९ हजार ते ११ हजार क्विंटलचा दर असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहिला असे गृहीत धरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Latest News Turi market prices be in October to December 2024 Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.