Halad Bajarbhav : हळदीच्या सरासरी साप्ताहिक किमतीचा (Turmeric weekly market price report) अहवाल पाहिला असता सांगली बाजारात 15 हजार 408 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला असे चित्र आहे. तर नांदेड बाजारात 14 हजार 227 रुपये, हिंगोली बाजारात 13 हजार 615 रुपये, वसमत बाजार समिती 14 हजार 250 रुपये तर रिसोड बाजार समिती 14 हजार 700 रुपयापर्यंत दर मिळाला आहे.
हळदीचे जागतिक उत्पादन (Turmeric Production) दरवर्षी सुमारे 11 लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे 80 टक्के योगदान आहे. त्यानंतर चीन (8 टक्के), म्यानमार (4 टक्के), नायजेरिया (3 टक्के) आणि बांगलादेश (3 टक्के) यांचा क्रमांक लागतो. हळदीच्या लागवडीखालील क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील सहाव्या क्रमांकावर आहे. पिकाचे क्षेत्रफळ सुमारे 16 हजार हेक्टर असून त्याचे उत्पादन 2 लाख 10 हजार टन आहे. तर महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत.
2024 ते 2031 या कालावधीत जागतिक हळदीच्या बाजारपेठेत लक्षणीय दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य USD 1080.34 दशलक्ष इतके होते आणि अंदाज कालावधीत 7.19 टक्केच्या CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे, 2031 पर्यंत USD 1640.13 दशलक्ष पर्यंत पोहोचेल. 2024 मध्ये बाजार स्थिर दराने वाढत आहे. 2024 ते 2031 च्या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणे दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य 1081.34 दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत 7.19% च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी 2031 पर्यंत 1640.13 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल.
आज काय भाव मिळाला?
आज 21 जुलै रोजीच्या बाजारभाव अहवालानुसार नांदेड बाजारात हळदीला सरासरी 14 हजार 800 रुपये, हिंगोली बाजारात 14 हजार 350 रुपये, वाशिम अनसिंग बाजारात 13 हजार 500, वाशिम बाजारात 14 हजार 500 रुपये, मुंबईसह सेनगाव बाजारात 13 हजार रुपयांचा दर मिळाला.