Lokmat Agro >बाजारहाट > Urad Dal : आरोग्यदायी उडीद डाळीचे अनके फायदे, सध्या दर काय आहेत? वाचा सविस्तर 

Urad Dal : आरोग्यदायी उडीद डाळीचे अनके फायदे, सध्या दर काय आहेत? वाचा सविस्तर 

Latest News Urad dal many benefits of healthy urad dal, see current market prices Read in detail | Urad Dal : आरोग्यदायी उडीद डाळीचे अनके फायदे, सध्या दर काय आहेत? वाचा सविस्तर 

Urad Dal : आरोग्यदायी उडीद डाळीचे अनके फायदे, सध्या दर काय आहेत? वाचा सविस्तर 

Urad Dal : ग्रामीण भागात उडदाची डाळ फारच प्रसिद्ध आहे. या दिवसात आहारात उडदाच्या डाळीचा समावेश केला जातो.

Urad Dal : ग्रामीण भागात उडदाची डाळ फारच प्रसिद्ध आहे. या दिवसात आहारात उडदाच्या डाळीचा समावेश केला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

भंडारा : उडीद डाळ (Udid dal) आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उडीद डाळीचा आहारात नियमित समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्रामीण भागात उडदाची डाळ फारच प्रसिद्ध आहे. या दिवसात आहारात उडदाच्या डाळीचा समावेश केला जातो. या उडीदाचा सध्याचा भाव आणि त्याचे आहारातील महत्व काय? हे पाहुयात... 

फक्त चवच नाही; तर आरोग्यालाही फायदा
उडीद डाळ फक्त चवीला चांगली आहे असे नाही, तर ती आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर्स आणि विविध जीवनसत्त्वे आहेत, ज्यामुळे शरीरातील विविध क्रियाकलाप सुधारतात.

हृदय निरोगी रहाते; वजन कमी करत...
उडीद डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यातील अँटीऑक्सिडंटस हृदयाच्या आजारांपासून बचाव करतात. तसेच डाळीतील फायबर्स वजन कमी करण्यास आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.

वर्षभरात किती वाढले दर?
गत वर्षभरात उडीद डाळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या उडीद डाळीचा दर १२० रुपये किलो आहे. एका वर्षात तिच्या किमतीत २०-३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आगामी दिवसांत डाळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर उडदाचा भाव पाहिला असता पुणे बाजारात सर्वसाधारण उडीदाला क्विंटलमागे ९ हजार ३०० रुपये, काळ्या उडीदाला लातूर बाजारात ६ हजार ६०० रुपये तर जळगाव बाजारात ६ हजार ५०० रुपये दर आहे. गावठी उडीदाचा एक प्रकार असतो, त्याला किरकोळ बाजारपेठेत ७५ ते ८० रुपये किलोचा भाव आहे. 

उडिद डाळीत प्रोटिन्स, फायबर आणखी काय? 
उडीद डाळ प्रोटीनचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, ज्यामुळे शरीराच्या पेर्शीच्या वाढीला आणि पुनर्निर्माणाला मदत होते. त्यासोबतच डाळीमध्ये उपस्थित असलेले फायबर्स पचन क्रिया सुधारतात आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Web Title: Latest News Urad dal many benefits of healthy urad dal, see current market prices Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.