वाढत्या तापमानामुळे दैनंदिन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी देखील घटल्याचे चित्र आहे. यात मिरची आणि लसणाचे बाजारभाव वाढले असल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. येथूनच मुंबई सारख्या मोठ्या बाजारात आवकही देखील केली जाते. सध्या - उन्हामुळे भाज्यांचे दर वधारले असल्याने सर्वसामान्य नागरिक - भाजीपाला खरेदीमध्ये हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या बाजारात दररोज सकाळी आणि सायंकाळी भाजीपाल्याची वाहने दाखल होतात. येथील किरकोळ विक्रेते आपला माल खरेदी करतात. त्यानंतर दिवसभर बसून भाजीपाला विकत असतात.
असे आहेत किरकोळ दर...
फुलकोबी 20 ते 30 रुपये नग, कोथिबीर 20 रुपये जुडी, हिरवी मिरची 80 रुपये किलो, ढेमसे 80 रुपये किलो, कारले 40 रुपये तसेच वांगी 40 रुपये किलो, बटाटे 30 रुपये किलो, चवळी शेंगा 40 रुपये किलो, पत्ताकोबी 40 रुपये किलो, फणस 40 रुपये किलो, भेंडी 40 रुपये किलो, शिमला मिरची 80 रुपये किलो, टोमॅटो 40 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत.
घाऊक बाजारातील आजचे भाजीपाला दर
बटाटा 2700 रुपये क्विंटल, भेंडी सरासरी 2500 हजार ते 04 हजार रुपये क्विंटल, फ्लावर सरासरी 1200 रुपये ते 02 हजार रुपये क्विंटल, गवार सरासरी 3700 रुपये ते 4500 रुपये क्विंटल, काकडी सरासरी 1400 रुपये ते 3500 रुपये, कारले सरासरी 2700 रुपये ते 4500 हजार रुपये, नागपूर बाजार समिती कोथिंबीरला क्विंटल मागे 3500 रुपये तर कोल्हापूर बाजार समितीत 7500 हजार रुपये दर मिळाला. टोमॅटोला क्विंटलमागे सरासरी 1200 रुपये ते 1500 रुपये पर्यंत, हिरवी मिरची अकलूज बाजार समितीत सरासरी 05 हजार 500 रुपये तर कोल्हापूर बाजार समितीत 05 हजार रुपये, तर लाल मिरचीला नागपूर बाजार समितीत जवळपास 11500 रुपये क्विंटल मागे दर मिळाला.
मी गेल्या अनेक वर्षांपासून गुजरी बाजारात कांदे, आलू, लसूण व मसाला पदार्थाची विक्री करीत आहे. गेल्या महिन्याभरापासून लसणाचे भाव वाढले आहे. सद्यस्थितीत लसूण 240 रुपये किलो दराने विकल्या जात आहे. आवक मंदावल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
- शरद चापले, विक्रेते.