Kanda Weekly Market : मागील सप्ताहातील कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) पाहिले असता कांद्याला कमीत कमी 2200 पासून ते 06 हजारपर्यंत दर मिळाला. याच आठवड्यात बांगलादेशने आयात शुल्क हटवल्यामुळे दरात काहीशी वाढ (Kanda Rate) झाल्याचे निदर्शनास आले. दुसरीकडे आवक मात्र घटत असल्याचं चित्र आहे.
मागील आठवड्यातील आवकेचा विचार केला तर 11 नोव्हेंबर रोजी जवळपास अडीच लाख क्विंटल आवक झाली होती. त्यानंतर पावणेदोन लाख झाली. त्यानंतर पुन्हा 02 लाख क्विंटल, पुन्हा पावणे 02 लाख क्विंटल झाली. तर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी सव्वा लाख क्विंटल ची आवक झाली. कांदा आवकेमध्ये चढ-उतार असल्याचं दिसून येत आहे. यात सोलापूर जिल्ह्यात (Solapur Kanda market) आवक वाढते आहे, तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात आवक मात्र घटत असल्याचे दिसत आहे.
कांदा बाजारभावाचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात आवक जरी घटली असली तरी बाजारभाव मात्र समाधानकारक आहेत. पुन्हा कांद्याला देवळा पिंपळगाव बसवंत लासलगाव या बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये देखील कांद्याला चांगला भाव मिळत आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात आवक वाढूनही बाजारभाव समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बाजार भाव पाहिले असता 11 नोव्हेंबर 2600 रुपये, 12 नोव्हेंबर रोजी 2400 रुपये, 13 नोव्हेंबर रोजी 2200 रुपये, 14 नोव्हेंबर रोजी 2100 रुपये 15 नोव्हेंबर रोजी 02 हजार रुपये, 16 नोव्हेंबर रोजी 02 हजार रुपये दर मिळाला. पद्धतीने सात दिवसात 600 रुपयांची लाल कांदा दरात घसरण झाली आहे.
तर नाशिकच्या लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात उन्हाळ कांद्याला 11 नोव्हेंबर रोजी 5 हजार 600 रुपये, 12 नोव्हेंबर रोजी 5851 रुपये 13 नोव्हेंबर रोजी 4600 रुपये, 14 नोव्हेंबर रोजी 5 हजार 651 रुपये, 15 नोव्हेंबर रोजी 04 हजार 300 रुपये, 16 नोव्हेंबर रोजी 4700 रुपये असा दर मिळाला. या आठवड्यात उन्हाळ कांदा दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळालं. या तब्बल हजार रुपयांची घसरण दिसून आली.
हेही वाचा : Cotton Market : कापूस बाजारात 50 ते 100 रुपयांनी घसरण सुरूच, वाचा साप्ताहिक बाजारभाव