Weekly Kanda Market : मागील आठवड्यातील लासलगाव बाजारातील (Lasalgaon Kanda Market) कांदा बाजार भाव पाहिले असता ०३ डिसेंबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ०४ हजार ४५५ रुपये तर लाल कांद्याला ०३ हजार ३७० रुपये, त्यानंतर ०४ डिसेंबर रोजी लाल कांद्याला २९०० रुपये...
तर ०५ डिसेंबर रोजी उन्हाळ कांद्याला ०३ हजार ८०० रुपये तर लाल कांद्याला २६०० रुपये, ०६ डिसेंबर रोजी उन्हाळ कांद्याला २५०० रुपये तर लाल कांद्याला ३१०० रुपये, ०७ डिसेंबर रोजी उन्हाळ कांद्याला ३२५१ रुपये तर लाल कांद्याला ३२०० दर मिळाला.
यावरून असे लक्षात आले की याच आठवड्यात उन्हाळ कांद्याची (Kanda Market Update) आवक पूर्णतः घटली, शिवाय बाजारभावही खाली आले. त्या उलट लाल कांद्याची आवक वाढून बाजारभावातही वाढ झाली. ती कशी तर ३ डिसेंबरला उन्हाळ कांद्याला ४ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर ७ डिसेंबरला 3251 रुपयांवर येऊन ठेपला. तर दुसरीकडे लाल कांद्याला ३ डिसेंबर रोजी ३ हजार ४०० रुपये दर मिळाला. तर ७ डिसेंबर रोजी ३२०० रुपये दर मिळाला.
तर दुसरीकडे सोलापूर बाजाराचा (Solapur Kanda Market) विचार करता लाल कांद्याची वाढली असून बाजारभावातही फरक दिसू लागला आहे. 4 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात सरासरी २९०० रुपये, ५ डिसेंबर आणि ७ डिसेंबर रोजी ३५०० रुपयांचा दर मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजारात ८ डिसेंबर रोजी थेट ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.
एकूणच मागील आठवड्यात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली तर बाजारभावात देखील घसरण झाली. तर लाल कांद्यात आवक वाढली असली तरी बाजारभावात देखील सुधारणा झाल्याचं दिसून आले. आता उन्हाळ कांद्याची कमी होऊन लाल कांद्याची वाढण्यास सुरवात होईल.
Kanda Market : पुणे बाजारात लोकल, तर सोलापूर बाजारात लाल कांदा आघाडीवर, वाचा आजचे बाजारभाव