Join us

Wheat Market : आज 2189 गव्हाला काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 7:10 PM

राज्यातील शेवगाव आणि सिल्लोड या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे 2189 आणि अर्जुन या वाणांची आवक झाली.

आज होळीनिमित्त राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद आहेत, त्यामुळे काहीच बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले आहेत. त्यातच आज रविवार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजारात माल घेऊन न जाणे पसंत केले. आज दोनच बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक झाली. त्यानुसार आज गव्हाला सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

आज 24 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील शेवगाव आणि सिल्लोड या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे 2189 आणि अर्जुन या वाणांची आवक झाली. शेवगाव बाजार समितीत 160 क्विंटल 2189 हा गहू दाखल झाला तर सिल्लोड बाजार समितीत अर्जुन गव्हाची 133 क्विंटलची आवक झाली. या दोन्हीही बाजार समितीत 2500 रुपये दर मिळाला.

जर कालचा बाजारभाव बघितला तर हायब्रीड गव्हाला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजार समितीत शरबती गव्हाची 1153 क्विंटलची आवक झाली होती, त्याला सरासरी 2980 रुपये दर मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2600 रुपये दर मिळाला. दरम्यान काल 2189 गव्हाला सरासरी 2400 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे गहू दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/03/2024
शेवगाव२१८९क्विंटल160230025002500
सिल्लोडअर्जुनक्विंटल133230030002500
23/03/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल350230027802600
दोंडाईचा---क्विंटल14260026002600
राहूरी -वांबोरी---क्विंटल55215025002300
पाचोरा---क्विंटल220230025502431
भोकर---क्विंटल19232723272327
सावनेर---क्विंटल15200024002250
वैजापूर---क्विंटल77225030002300
नांदूरा---क्विंटल110190025502550
टॅग्स :शेतीगहूमार्केट यार्डसोलापूरऔरंगाबाद