Lokmat Agro >बाजारहाट > Wheat MSP : गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत 14 वर्षांत किती वाढ झाली? वाचा सविस्तर 

Wheat MSP : गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत 14 वर्षांत किती वाढ झाली? वाचा सविस्तर 

Latest News Wheat MSP How much has minimum support price of wheat increased in 14 years Read in detail  | Wheat MSP : गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत 14 वर्षांत किती वाढ झाली? वाचा सविस्तर 

Wheat MSP : गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत 14 वर्षांत किती वाढ झाली? वाचा सविस्तर 

Wheat MSP : त्यानुसार मागील चौदा वर्षांत गहू पिकाची एमएसपीत केवळ 925 रुपयांची वाढ झाली आहे. 

Wheat MSP : त्यानुसार मागील चौदा वर्षांत गहू पिकाची एमएसपीत केवळ 925 रुपयांची वाढ झाली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Wheat MSP : लवकरच रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरवात होणार असून शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड करत असतात. मात्र मागील काही वर्षात गव्हाला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आता केंद्र सरकारकडून गव्हाला किमान आधारभूत किंमत ठरवून दिलेली आहे. त्यानुसार मागील चौदा वर्षांत गहू पिकाची एमएसपीत केवळ ९२५ रुपयांची वाढ झाली आहे. 

२०१३-१४ मध्ये साधारण गव्हाला (Wheat Crop) प्रतिक्विंटल १३५० रुपये असा दर होता. २०२०-२१ मध्ये तो १९७५ रुपये आहे. गहू हा मोठ्या प्रमाणात शेतकरी करत असतात. थंडीच्या दिवसातील पीक असल्याने लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो. आता हळूहळू यातही वाढ होऊ लागला आहे. तर आजचा बाजारभाव पाहिला असता, ३ हजार रुपये ते ४ हजार रुपये दर मिळतो आहे. तर यंदाचा हमीभाव पाहिला असता, २२७५ रुपये इतका आहे. त्यामुळे शासकीय एमएसपीपेक्षा बाजारभाव समाधानकारक मिळत असल्याचे चित्र आहे. 

एकीकडे गहू शेतीला खर्च वाढत असताना गेल्या १४ वर्षांपासून गव्हाला अल्पशी दरवाढ मिळत आहे. गहु पिकासाठी उत्पादन खर्च एकरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र त्या बदल्यात बाजारभाव कमी असल्याचे चित्र आहे. त्यातही किमान आधारभूत किंमत कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कारण गेल्या १४ वर्षांत केवळ ९२५ रुपयांची वाढ झाली आहे. 

अशी होत गव्हाची दरवाढ 

गेल्या १४ वर्षांतील गव्हाच्या हमीभावात झालेल्या दरवाढीवर एक नजर टाकल्यास सन २०१३-१४ या वर्षात साधारण धानाला १३५० रुपये प्रतिक्चिंटल असा दर होता. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये ५० रुपयांची वाढ, २०१५-१६ मध्ये ५० रुपयांची वाढ, तर २०१६-१७ मध्ये ७५ रुपये दरवाढ मिळाली. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये १०० रुपये, २०१८-१९ मध्ये ११० रुपये आणि २०१९-२० मध्ये १०५ रुपये दरवाढ दिली. २०२०-२१ मध्ये ८५ रुपये दरवाढ मिळाली. २०२१-२२ मध्ये ५० रुपये आणि २०२२-२३ साठी अवघी ४० रुपये, तर सन २०२४ साली २१० रुपये तर यंदा २०२४-२५ मध्ये १५० रुपयांची वाढ होऊन २२७५ रुपये एमएसपी  करण्यात आली आहे. 

Web Title: Latest News Wheat MSP How much has minimum support price of wheat increased in 14 years Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.