Dasara Zendu Market : आज दसऱ्यानिमित्त बाजार समित्यांमध्ये झेंडूची (Zendu Bajarbhav) विक्रमी आवक झाली आहे. राज्यातील बाजारात जवळपास २ हजार क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली आहे. यात चांदवड बाजारात एकाच दिवशी एक हजार क्विंटल झेंडू बाजारात आला. तर शेकडा दीडशे ते रुपये भाव मिळत आहेत. तर प्रति क्विंटल २५०० रुपयापासून ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
दसऱ्याला झेंडूच्या फुलांना (Dasara 2024) मोठी मागणी असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच मोठी उलाढाल होत असते. तर दसऱ्याला देखील सर्वाधिक झेंडू विक्री होत असतो. मात्र यंदाही पावसाचा फटका झेंडू शेतीला बसला असून काही भागातील झेंडूला वाचविण्यात यश आले आहे. त्यामुळे कालपासून झेंडूचे दर तेजीत असल्याचे चित्र आहे. काल दिवसभरात झेंडूला प्रति शेकडा १५० ते २०० रुपये आणि पिवळा, केशरी झेंडूसही तितकीच मागणी असून बाजारात १२० ते १५० रुपये प्रति शेकडा असा दर आहे.
एक हजार क्विंटल झेंडूची आवक
नाशिकच्या चांदवड बाजारात लिलावाच्या पहिल्याच दिवशी अंदाजे १ हजार क्विंटल झेंडूच्या फुलांची आवक झालेली असून त्यात लाल झेंडूच्या फुलास प्रति क्विंटल २००० ते ४५०० सरासरी ३६०० व पिवळ्या झेंडूस २००० ते ५००० सरासरी भाव ४००० रुपये मिळाले. यावर्षी प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकऱ्यांनी फुलांचे उत्पादन चांगले घेतलेले आहे. परंतु सद्यस्थितीतील खराब हवामान व पावसामुळे फुलांची गुणवत्ता कमी झालेली आहे.
क्विंटलचा भाव कसा?
जळगाव बाजारात सर्वसाधारण झेंडूला १५०० रुपये, लोकल झेंडूला २५०० रुपये, नागपूर बाजारात ६ हजार २५० रुपये, पुणे बाजारात ७ हजार ५०० रुपये, सातारा बाजारात सर्वसाधारण झेंडूला ५ हजार रुपये दर मिळतो आहे.