Lokmat Agro >बाजारहाट > पावसाचा खोळंबा, कृउबातील आवकही घटली, बाजारपेठ झाली ठप्प

पावसाचा खोळंबा, कृउबातील आवकही घटली, बाजारपेठ झाली ठप्प

Latur apmc business slow downs due to spell in monsoon | पावसाचा खोळंबा, कृउबातील आवकही घटली, बाजारपेठ झाली ठप्प

पावसाचा खोळंबा, कृउबातील आवकही घटली, बाजारपेठ झाली ठप्प

समाधानकारक पाऊस नसल्याने लातूर बाजारपेठ ठप्प झाली असून  १५ हजार क्विंटलच्या आत आवक होत आहे.

समाधानकारक पाऊस नसल्याने लातूर बाजारपेठ ठप्प झाली असून  १५ हजार क्विंटलच्या आत आवक होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

 यंदा पावसाळा लांबला असल्याने पेरण्या लांबल्या. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आद्रात थोडा पाऊस पडला. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या ठप्प आहेत. परिणामी, लातूरच्या बाजारपेठेतील शेतमालाची आवकही घटली आहे. 

ज्या दिवशी थोडा पाऊस पडेल. त्या दिवशी शेतमाल बाजारपेठेत वाढत आहे. जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये ६० मिमी पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्यामध्ये १७.८ मिमी पाऊस झाला आहे. कृषी विभागाच्या अभ्यासानुसार पेरणीसाठी पुरेशी ओल आवश्यक असते. ती अद्याप झालेली नाही. सलग ९० मिमी पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी ओल जाते. त्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो.

महिनाभरापासून आवक मंदावलेलीच
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या महिन्याभरापासून आवक घटलेली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये १५ हजार टनाच्या आज शेतमालाची आवक आहे. जी की पावसाळ्यामध्ये पेरणीच्या तोंडावर एकट्या सोयाबीनची तेवढी आवक असते.

परंतु यंदा कोणत्या शेतमालाची आवक बाजारात नाही शेतकन्यांनी पाऊस सुरु झाल्यानंतर शेतमाल बाजारात न्यायचा असे निश्चित केलेले असते. त्यामुळेच बाजारपेठेतील गजबज वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

चाढ्यावरची मूठ चाढ्यावरच
 यंदाच्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये ६० ते ७५ मिमीच्या आसपास पाऊस झाला आहे. जून महिन्यामध्ये ६० आणि जुलै महिन्यामध्ये १७.८ मीमी पावसाची नोंद आहे. म्हणजे ६५ ते ७५ च्या दरम्यान पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. परंतु हा पाऊस सगळीकडे सारखा झालेला नाही. पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या नाहीत. जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे अद्याप चाड्यावर मोठ नाही, अशी स्थिती जिल्ह्यातील शेत शिवारात आहे.

लातूर जिल्ह्यात सहा ते साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. त्यापैकी पाच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो मात्र यंदा पाऊस नसल्यामुळे हजार दीड हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. जिथे पाऊस झालेला आहे, किंवा पाण्याची सोय आहे. अशा ठिकाणी शेतकरी पेरण्या करीत आहेत. जिल्ह्यात पुरेशी ओल होईल असा पाऊस झाला नसल्यामुळे चाढ्यावरची मूठ चाढ्यावरच आहे.
 

Web Title: Latur apmc business slow downs due to spell in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.